Matunga LBS Market : माटुंग्यातील लाल बहादूर शास्त्री मंडईची होणार डागडुजी

मंडईच्या इमारतीची दुरुस्तीमध्ये आवश्यतेनुसार पॉलीमर मॉडीफाईड मॉर्टर ट्रीटमेंट, मायक्रो काँक्रीट, जॅकेटींग आदी प्रकारची कामे, गिलाव्याची कामे, रंगकाम करणे, वीट बांधकाम, प्लंबिंग, लादीकरण तसेच विद्युत कामे आदींचा समावेश आहे.

768
Matunga LBS Market : माटुंग्यातील लाल बहादूर शास्त्री मंडईची होणार डागडुजी

माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील लाल बहादूर शास्त्री महापालिका मंडईच्या (Matunga LBS Market) दुरुस्तीचे काम आता महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. ही इमारत साठ वर्षे जुनी असल्याने या मंडईच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार असून पुढील वर्ष भरात या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे. तब्बल सात कोटी रुपयांचा खर्च या दुरुस्तीवर केला जाणार आहे. (Matunga LBS Market)

माटुंगा मध्य रेल्वे स्थानकाजवळील एल. एन. मार्गावरील लाल बहादूर शास्त्री महापालिकेची मंडई (Matunga LBS Market) आहे. या मंडईचे स्ट्रक्चरल ऑडीट मार्च २०२२ मध्ये करण्यात आले. तळ मजला अधिक तीन मजल्याची ही इमारत आहे. या मंडईच्या (Matunga LBS Market) इमारतीची दुरुस्तीमध्ये आवश्यतेनुसार पॉलीमर मॉडीफाईड मॉर्टर ट्रीटमेंट, मायक्रो काँक्रीट, जॅकेटींग आदी प्रकारची कामे, गिलाव्याची कामे, रंगकाम करणे, वीट बांधकाम, प्लंबिंग, लादीकरण तसेच विद्युत कामे आदींचा समावेश आहे. या दुरुस्तीच्या कामांसाठी ७ कोटी ०३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी देव कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Matunga LBS Market)

(हेही वाचा – BJP: ‘गाव चलो अभियाना’च्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार – आमदार देवयानी फरांदे)

माटुंग्यातील या लाल बहादूर शास्त्री मंडईत (Matunga LBS Market) सध्या दाटीवाटीने गाळेधारकांनी धंदे थाटले असून यामधून ग्राहकही प्रवेश करू शकत नाही. मंडईच्या (Matunga LBS Market) प्रवेशद्वाराजवळही अन्य व्यवसायिकांनी जागा अडवून ठेवले. परंतु मंडईच्या खालूनही चालण्यास जागा नसून मंडईतील बाहेरची जागाच अडवून ठेवल्याने आतमध्ये जाण्यासही जागा नसल्याने अनेक ग्राहक हे बाहेरुनच खरेदी करून जात आहे. त्यामुळे मंडईतील ग्राहकांच्या वस्तूंची विक्री होण्याची काळजी महापालिकेच्या बाजार विभागाकडून घेतली जात नाही. त्यामुळे मंडई (Matunga LBS Market) परिसरातील या अतिक्रमणामुळे मंडईतील परवानाधारक गाळेधारक त्रस्त आहे. त्यामुळे मंडईची दुरुस्ती करा पण मंडईला विळखा घातलेले अतिक्रमण हटवा अशी मागणी गाळेधारकांकडून केली जात आहे. (Matunga LBS Market)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.