Jasprit Bumrah : आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल ठरलेला जसप्रीत बुमरा पहिला भारतीय तेज गोलंदाज

फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर बुमराने शेवटची कसोटी भारताला आपल्या गोलंदाजीने जिंकून दिली आहे. 

215
Jasprit Bumrah : आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल ठरलेला जसप्रीत बुमरा पहिला भारतीय तेज गोलंदाज
  • ऋजुता लुकतुके

भारताचा अव्वल तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिला भारतीय तेज गोलंदाज ठरला आहे. अलीकडेच झालेल्या विशाखापट्टणम कसोटीत भारताने इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवला. आणि या विजयात बुमराने (Jasprit Bumrah) दोन्ही डावांत मिळून ९ बळी मिळवत मोठी भूमिका बजावली. बुमराला (Jasprit Bumrah) कसोटीत सामनावीराचा पुरस्कार तर मिळालाच. शिवाय आयसीसी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. (Jasprit Bumrah)

मागच्या आठवड्यातील कामगिरीच्या जोरावर तो तीन स्थान वर चढून पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने आपला साथीदार रवीचंद्रन अश्विनला मागे टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा कासिगो रबाडा क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. (Jasprit Bumrah)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली तिसरी आणि चौथी कसोटीही खेळणार नाही?)

बुमरा पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थानावर

गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून रवीचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल होता. पण, इंग्लंड विरुद्घच्या मालिकेत अश्विन तितकासा प्रभावी ठरलेला नाही. विशाखापट्टणम कसोटीत त्याने दोन्ही डावांत मिळून ३ बळी मिळवले. त्यामुळे क्रमवारीत अश्विन दोन स्थानं खाली घररून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (Jasprit Bumrah)

३० वर्षीय बुमरा पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थानावर पोहोचला आहे. २०२४ मध्ये बुमराने (Jasprit Bumrah) डावात ५ बळी घेण्याची किमया दोनदा केली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केपटाऊन कसोटीत त्याने दुसऱ्या डावात ६१ धावांत ६ बळी टिपले होते. तर आता विशाखापट्टणममध्ये त्याने ४५ धावांत ६ बळी मिळवले. आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावणारा बुमरा (Jasprit Bumrah) हा चौथा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी रवींद्र जडेजा, अश्विन आणि बिशनसिंग बेदी यांनी ही कामगिरी केली आहे. पण, बुमरा पहिला तेज गोलंदाज आहे. (Jasprit Bumrah)

बुमराबरोबरच (Jasprit Bumrah) यशस्वी जयस्वाल या आणखी एका भारतीय खेळाडूने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. विशाखापट्टणम कसोटीत २०९ धावा करून तो ३७ स्थानं वर चढून थेट २९व्या स्थानावर पोहोचला आहे. (Jasprit Bumrah)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.