लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत उपोषण करण्यासाठी रवाना झाल्यानंतर सरकारने सर्व मागण्या मान्य करत अध्यादेश काढणार असल्याचे आश्वासन दिले. या अश्वासनानंतर मराठा आंदोलकांकडून (Maratha Reservation) आनंदोत्सव साजरा करण्यात आला, मात्र या घोषणेनंतर जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा उपोषणाला बसणार असे जाहीर केले. मनोज जरांगे यांनी शनिवार, १० फेब्रुवारीपासून पुन्हा आपण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
(हेही वाचा – HONOR X9B 5G : ऑनर कंपनीचा भगव्या रंगातील ‘हा’ फोन तुम्ही पाहिला का?)
यावेळी मनोज जरांगे (Maratha Reservation) म्हणाले की, “मी एवढ्यावर थांबणाऱ्यातला नाही. सरकारने दिलेले अश्वासन पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा उपोषण करणार. सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी आमची भूमिका आहे. सगेसोयऱ्यांनादेखील आरक्षणात घेण्याची आमची मागणी आहे.”
(हेही वाचा – RBI Interest Rates : सलग सहाव्यांदा व्याजदर जैसे थे)
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने १५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Jasprit Bumrah : आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल ठरलेला जसप्रीत बुमरा पहिला भारतीय तेज गोलंदाज)
मराठा समाजाला (Maratha Reservation) कायद्याच्या चौकटीत कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community