Rashid Mian Makbara की शिव मंदिर ? न्यायालयाने दिले सर्वेक्षणाचे आदेश

मऊ नामक भागातील रशिदाबाद येथे असलेल्या या मकबरापूर्वी प्राचीन काळातील गंगेश्वरनाथ शिव मंदिर होते. सन १६०७ मध्ये मुघलांनी ते पाडले होते. या ठिकाणी नवाब रशीद खान (रशीद मियाँ) यांचा मकबरा बांधण्यात आला. त्याला रशीद मिया मकबरा म्हटले जाते.

336
Rashid Mian Makbara की शिव मंदिर ? न्यायालयाने दिले सर्वेक्षणाचे आदेश

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथून ज्ञानवापी मशिदीसारखेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कयमगंज तालुक्यातील मऊ राशिदाबाद येथील रशीद मियांची (Rashid Mian Makbara) शंभर वर्षे जुनी कबर हे मूळ शिवमंदिर असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदू पक्षाने न्यायालयात याचिका दाखल केली. अशातच न्यायालयाने आता सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – Ayodhya Train : अयोध्येत जाणाऱ्या आस्था स्पेशल ट्रेनवर पुण्यात हल्ला)

मुघल आक्रमणकर्त्यांनी पाडले शिव मंदिर –

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या थडग्याची देखभाल पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येते. फर्रुखाबादमधील कायमगंज शहरातील रहिवासी असलेल्या हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते प्रदीप सक्सेना यांनी दावा केला आहे की, राशिदाबाद (Rashid Mian Makbara) गावातील थडगे हे शिवमंदिर आहे आणि त्यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पुरातत्व विभागाला नोटीस बजावून थडगेचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. त्याच वेळी, असा दावा केला जातो की हे एक शिव मंदिर होते, जे मुघल आक्रमणकर्त्यांनी पाडले आणि एक थडगे बनवले.

(हेही वाचा – Lionel Messi : इंटर मियामीच्या आगामी प्रदर्शनीय सामन्यातही लायनेल मेस्सी बेंचवरच)

या प्रकरणी न्यायालयाने खटला स्वीकारला असून थडग्याच्या अमीन सर्वेक्षणाचा अहवाल मागितला आहे.

प्रदीप सक्सेना यांचा दावा आहे की,

मऊ नामक भागातील रशिदाबाद येथे असलेल्या या मकबरापूर्वी प्राचीन काळातील गंगेश्वरनाथ शिव मंदिर होते. सन १६०७ मध्ये मुघलांनी ते पाडले होते. या ठिकाणी नवाब रशीद खान (रशीद मियाँ) यांचा मकबरा बांधण्यात आला. त्याला रशीद मिया मकबरा (Rashid Mian Makbara) म्हटले जाते. जुन्या शिव मंदिराची मूळ रचना बदलली नाही. याउलट मंदिरात ज्या ठिकाणी शिवलिंग होते, ते बाजूला करून त्याच ठिकाणी मकबरा बनवण्यात आला. प्रदीप सक्सेना यांनी याबाबत एक याचिका न्यायालयात दाखल केली. दरम्यान, रशीद मियां मकबरा येथे सर्व प्रकारची हिंदू प्रतिके आढळून येतात. ती पाहायला मिळू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे. (Rashid Mian Makbara)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.