PM Narendra Modi यांनी केले मनमोहन सिंह यांचे कौतुक

राज्यसभेतील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्यासह ६८ राज्यसभा सदस्यांना निरोप दिला, जे यावर्षी संसदेतून निवृत्त होणार आहेत. "मला आज डॉ. मनमोहन सिंह यांचे स्मरण करायचे आहे, त्यांचे योगदान खूप मोठे आहे. इतक्या दीर्घ काळासाठी त्यांनी ज्या प्रकारे या सभागृहाला आणि देशाला मार्गदर्शन केले, त्यासाठी डॉ. मनमोहन सिंह सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधान म्हणाले.

269
PM Narendra Modi यांनी केले मनमोहन सिंह यांचे कौतुक

राज्यसभेतील सर्वपक्षीय ५६ खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपतो आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (८ फेब्रुवारी) या खासदारांच्या आभार प्रदर्शनाची चर्चा राज्यसभेत पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं कौतुक केलं आहे. त्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे.

(हेही वाचा – Lionel Messi : इंटर मियामीच्या आगामी प्रदर्शनीय सामन्यातही लायनेल मेस्सी बेंचवरच)

अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन्ही गटांकडून आपली बाजू मांडली गेली. अशातच गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार मनमोहन सिंह यांचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

राज्यसभेतील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मनमोहन सिंह यांच्यासह ६८ राज्यसभा सदस्यांना निरोप दिला, जे यावर्षी संसदेतून निवृत्त होणार आहेत. “मला आज डॉ. मनमोहन सिंह यांचे स्मरण करायचे आहे, त्यांचे योगदान खूप मोठे आहे. इतक्या दीर्घ काळासाठी त्यांनी ज्या प्रकारे या सभागृहाला आणि देशाला मार्गदर्शन केले, त्यासाठी डॉ. मनमोहन सिंह सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधान म्हणाले.

(हेही वाचा – MNS : परशुराम उपरकर यांची मनसेतून हकालपट्टी)

पुढे बोलताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की; “सहा वेळा या सभागृहात त्यांनी आपले मौलिक विचार मांडले. सभागृह नेता व विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी या सभागृहात खूप मोठं योगदान दिलं आहे. वैचारिक मतभेद अल्पकालीन असतात. पण एवढ्या मोठ्या काळासाठी ज्या प्रकारे त्यांनी या सभागृहाला मार्गदर्शन केलं, देशाला मार्गदर्शन केलं, ते पाहाता जेव्हा केव्हा भारतीय लोकशाहीच्या संदर्भात काही मोजक्या लोकांची चर्चा होईल, त्यात मनमोहन सिंग यांची चर्चा नक्की होईल”

(हेही वाचा – Famous Singers In India : कोण आहेत भारतातील सर्वोत्तम गायक?)

संसदेतील मनमोहन सिंह यांच्या योगदानाचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी व्हीलचेअरवर बसून राज्यसभेत मतदान केले. निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या अनुभवाचा देशाला फायदा होईल, नवीन पिढ्यांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे”. असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.