भारत देश हा कलेचा जन्मदाता आहे. इथे विविध प्रकारच्या कला जन्मल्या आणि बाहेरुन आलेल्या कलांना या देशात आसरा मिळाला. भारताच्या बाहेरुन अनेक कला प्रकार आले, ते इथे बागडले, त्यांचे भारतीयकरण झाले आणि पुढे त्या कला भारताच्याच होऊन गेल्या. भारताने अनेक कला जगालाही अर्पण केल्या आहेत. आपल्याकडे गायन ही कला विविध मार्गांनी जोपासली गेली आहे. शास्त्रीय संगीताला आपल्याकडे जितका मान आहे, तितकाच मान लोकगायनालाही मिळाला आहे. (Famous Singers In India)
भारतात अनेक उत्तमोत्तम गायक जन्माला आले. काही गायकांनी तर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. भारतात इतके उत्कृष्ट गायक आहेत की त्यांची यादी देण्यासाठी हजारो पुस्तके लिहावी लागतील. मात्र आम्ही तुम्हाला काही सर्वोत्कृष्ट गायकांबद्दल (Famous Singers In India) सांगणार आहोत, ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आणि ज्यांनी कलेद्वारे आपल्या देशाचा सन्मानदेखील वाढवला. (Famous Singers In India)
लता मंगेशकर
सर्वात आधी नाव घ्यावेसे वाटते ते गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९२९ रोजी इंदूर येथे झाला. विशेष म्हणजे त्यांनी जवळजवळ ६० पेक्षा अधिक वर्षे गाणी गायली. एकेकाळानंतर तर त्यांनी फिल्मफेअर इत्यादी पुरस्कार स्वीकारणेही सोडले होते. कारण नवोदितांना संधी मिळायला हवी. भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला. (Famous Singers In India)
एस. पी. बालसुब्रमण्यम
९० च्या दशकात त्यांनी अनेक हिंदी गाणी गायली. बालसुब्रमण्यम (S. P. Balasubramaniam) यांचा आवाज अतिशय गोड आणि वेगळा होता. आजा शाम होने आयी, मेरे रंग मे रंगने वाली, जिये तो जिये कैसे अशी अनेक सुंदर गाणी गाऊन त्यांनी हिंदीतही नाव कमावलं. त्यांचा जन्म ४ जून १९४६ ला झाला. ते पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि व्हॉईस-ओव्हर कलाकार होते. बालसुब्रह्मण्यम यांना पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या गायन कारकीर्दीत सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. (Famous Singers In India)
किशोर कुमार
किशोरदा… हे नाव कोणाला नाही माहित! भारतीय गायन क्षेत्रातलं अत्यंत आवडतं नाव म्हणजे किशोर कुमार (Kishore Kumar). त्यांनी विनोदी, रोमॅंटिक, दुःखात्मक अशी अनेक प्रकारची गाणी गायली आहेत आणि आजही लोक त्यांच्या आवाजाचा आस्वाद घेत असतात. त्यांच अजन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला. किशोर कुमार एक अभिनेता, चित्रपट निर्माता, लेखक, संगीत दिग्दर्शक, गीतकार आणि पार्श्वगायक होते. किशोर कुमार यांनी विविध शैली आणि अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. १९९७ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांच्या नावाने ’किशोर कुमार पुरस्कार’ सुरू करण्यात आला. (Famous Singers In India)
(हेही वाचा – Varun Kumar Rape Case : हॉकीपटू वरुण कुमार विरुद्ध बंगळुरू पोलीस करणार चौकशी)
ए. आर. रहमान
भारताचं नाव ज्यांनी जगभरात गाजवलं, त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे ए. आर. रहमान (A. R. Rehman). ’मां तुझे सलाम’ हे गाणं त्यांनी इतक्या सुरेख पद्धतीने गायले आहे की ऐकताना माणूस एका वेगळ्याच जगात जातो. ए. आर. रहमान हे चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि रेकॉर्ड प्रड्युसर आहेत. संगीतकार म्हणून ते सर्वोत्कृष्ट आहेत. त्याला दोन ग्रॅमी पुरस्कार, दोन अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि बाफ्टा पुरस्कार यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. (Famous Singers In India)
सुधीर फडके
सावरकर भक्त सुधीर फडके (Sudhir Phadke) यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं. ते उत्कृष्ट गायक आणि संगीतकार होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी झाला. त्यांना आदराने ’बाबुजी’ म्हणत. त्यांनी अनेक मराठी गाणी गायली आणि संगीतबद्ध केली आहेत. गीत रामायण ही कलाकृती तर अविस्मरणीय आहे. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि सह्याद्री स्वररत्न पुरस्कार मिळाले आहेत. (Famous Singers In India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community