AI in Economy : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा १० टक्के होईल,’ – सत्या नाडेला

२०२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची होईल. आणि यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाटाही १० टक्के असेल असं सत्या नाडेला यांनी बोलून दाखवलं आहे.

354
AI in Economy : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा १० टक्के होईल,’ - सत्या नाडेला
  • ऋजुता लुकतुके

ओपन एआय मीडियाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटजीपीटी (chatgpt) हा पहिला प्रोग्राम गेल्यावर्षी बाजारात आणला आणि तिथपासून टेक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इतरही काही मोठ्या टेक कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेकडे झपाट्याने वळताना दिसत आहेत. चॅटजीपीटीशी (chatgpt) करार करून हा प्रोग्राम मायक्रोसॉफ्टच्या व्यासपीठावर उपलब्ध करून या क्षेत्रात सध्या मायक्रोसॉफ्टने बाजी मारली आहे. आणि मागच्या वर्षभरात मायक्रोसॉफ्ट कंपनीला याचा फायदाही झाला आहे. (AI in Economy)

आता कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांना कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीही भारत हीच मोठी बाजारपेठ वाटते. अलीकडेच ते काही दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. आणि सीएनबीसी वाहिनीवर बोलताना त्यांनी पहिला विचार व्यक्त केला तो भारतीय टेक क्षेत्राचं कृत्रिम बुद्धिमत्तेत योगदान याविषयी. (AI in Economy)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी केले मनमोहन सिंह यांचे कौतुक)

चॅटजीपीटीचे हे आहेत फायदे 

‘भारत ही विकसनशील देशांमध्ये एक सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. दोन वर्षांत तिचा आकार ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका होईल. आणि त्यातील १० टक्के वाटा हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा असेल,’ असं नडेला यांनी या मुलाखतीत ठासून सांगितलं. (AI in Economy)

चॅटजीपीटीचं (chatgpt) मॉडेल भारतात आल्यानंतर तिचे ग्राहक झपाट्याने वाढल्याचं नाडेला यांनी नमूद केलं. ‘कंपन्या, सेवाभावी संस्था आणि व्यावसायिक यांनी चॅटजीपीटीचा (chatgpt) मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. इतकंच नाही तर शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही या सेवेचा विस्तार झाला आहे. आता इथं चॅटजीपीटीवर (chatgpt) आधारित उद्योगही सुरू होत आहेत,’ असं आत्मविश्वासपूर्ण विधान सत्या नाडेला यांनी केलं. (AI in Economy)

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगारावर काय परिणाम होऊ शकतो याविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘सुरुवातीला काही नोकऱ्या कमी होऊ शकतात. पण, चॅटजीपीटी (chatgpt) हे साधन आहे, कौशल्य नाही. त्यामुळे माणसाने आपल्यातील कौशल्य विकास थांबवला नाही तर त्याची प्रगती होतच राहणार. मध्यमवयीन माणसालाही नवीन कौशल्य शिकायची संधी आहे. ती सवय त्याने सोडता कामा नये.’ सुरुवातीला नोकऱ्या जाण्याचं प्रमाण थोडं जास्त असलं तरी हळू हळू ही परिस्थिती आटोक्यात येईल, असं नाडेला यांचं म्हणणं आहे. (AI in Economy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.