केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर येत्या १५ ,१६ आणि १७ फेब्रुवारी रोजी शरद पवार (Sharad Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. त्यानंतर १८ तारखेला त्यांचा पुरंदर आणि २१ तारखेला आंबेगाव असा दौरा असणार आहे.
(हेही वाचा – AI in Economy : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा १० टक्के होईल,’ – सत्या नाडेला)
पुन्हा नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्याचा प्रयत्न –
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. पुणे जिल्ह्यातील दौरा संपल्यानंतर शरद पवार राज्य पिंजून काढणार आहे. पुन्हा नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यव्यापी या दौऱ्यात भाजपसोबत अजित पवार यांनाही ते लक्ष्य करणार आहेत.
(हेही वाचा – Mumbai Police – Ed : १६४ कोटी रुपयांचे खंडणी प्रकरण : ईडी आणि पोलीस तपास यंत्रणेत अंतर्गत धुसफूस)
पवार यांना नवीन पक्ष मिळाल्यानंतर पहिला मेळावा –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा (Sharad Pawar) गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी पुण्यातील हडपसरमध्ये पहिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील अध्यक्ष, सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community