गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले असून त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. (Farmer Accident Insurance)
राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) लागू करण्यात आली आहे. राज्यात ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसांच्या खंडित कालावधीतील ७७ (७३ मृत्यू व ४ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी १ कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे. (Farmer Accident Insurance)
(हेही वाचा – Sharad Pawar : नवीन पक्ष मिळाल्यानंतर शरद पवार पुन्हा मैदानात उतरणार)
यासाठी शासनाने दिली मान्यता
तसेच राज्यात २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील २३९ दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील २३९ (२३७ मृत्यू व २ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी ४ कोटी ७६ लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यातील २१३७ (२०९४ मृत्यू व ४३ अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी ४२ कोटी ३६ लाख रुपये अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांना आर्थिक मदतीची ४७ कोटी १२ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे. (Farmer Accident Insurance)
अशा प्रकारे राज्यात ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ आणि २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीतील एकूण २४५३ दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (Farmer Accident Insurance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community