Pradeep Sharma : माजी आमदार आणि माजी चकमक फेम पोलीस अधिकारी यांच्या घरी आयकर विभागाचे छापे

माजी आमदार घनश्याम दुबे यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे, त्याच बरोबर एका आयएएस अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी आमदार आणि व्यापारी घनश्याम दुबे यांच्यावर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

606
Pradeep Sharma : माजी आमदार आणि माजी चकमक फेम पोलीस अधिकारी यांच्या घरी आयकर विभागाचे छापे

माजी चकमकफेम प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्यासह माजी आमदार घनश्याम दुबे यांच्या पवई येथील निवासस्थानी आयकर विभागाकडून गुरुवारी (८ फेब्रुवारी) छापेमारी करण्यात आली. एका कंपनीच्या आयकर चुकवेगिरी प्रकरणी ही छापेमारी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis – Google : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी महाराष्ट्राने गुगलसोबत केला सामंजस्य करार)

मनसुख हिरेन हत्या आणि अंटालिया बॉम्ब प्रकरणात नुकतेच जामिनावर बाहेर आलेले चकमक फेम माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या पवई हिरानंदानी एव्हरेस्ट हाईट या इमारतीत असणाऱ्या घरावर आयकर विभागा कडून गुरुवारी छापे टाकण्यात येत आहे. अंधेरी पूर्व येथे राहणारे प्रदीप शर्मा हे आता पवई येथे राहत आहे. तर पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती नंतर प्रदीप शर्मा हे पी.एस फाउंडेशन ही गैरसरकारी संस्था चालवीत आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा जातीवाचक उल्लेख)

तसेच माजी आमदार घनश्याम दुबे यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे, त्याच बरोबर एका आयएएस अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी आमदार आणि व्यापारी घनश्याम दुबे यांच्यावर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी असलेले दुबे, त्याचा चालक हरी प्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ही आयकर विभागाची कारवाई असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुबे आणि शर्मा यांचे व्यवसायिक सबंध असल्याचेही समजते आहे. (Pradeep Sharma)

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : सरकारच्या विरोधात बोलणार होतो म्हणून राजीनामा दिला)

प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना मनसुख हिरेन आणि अंटालिया बॉम्ब प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनआयएने ही अटक केली होती, दोन वर्षांनी शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.