Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत

सध्या मुंबईत ७०० किलोमीटर लांबीचे रस्ते धुवून स्वच्छ केले जात आहेत. स्‍वच्‍छता मोहीम ही निरंतर प्रक्रिया असून त्‍यात सातत्‍य राखायला हवे. त्‍यासाठी यापुढे २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) दर शनिवारी एकाच दिवशी लोकसहभागातून सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबवावी, अशाप्रकारच्या सुचना आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिल्या आहेत.

370
Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत
Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत

टँकरद्वारे रस्ते, पदपथ, चौक आदी एक दिवसाआड धुतले जात आहेत. त्‍यात वाढ झाली पाहिजे, असे निर्देश देताना आयुक्तांनी दररोज १००० किलोमीटर रस्‍ते धुण्‍याचे उद्दिष्‍टय साध्‍य झाले पाहिजे, अशा सूचना सहायक आयुक्तांना केल्या आहेत. सध्या मुंबईत ७०० किलोमीटर लांबीचे रस्ते धुवून स्वच्छ केले जात आहेत. स्‍वच्‍छता मोहीम (Mumbai Deep Cleaning) ही निरंतर प्रक्रिया असून त्‍यात सातत्‍य राखायला हवे. त्‍यासाठी यापुढे २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) दर शनिवारी एकाच दिवशी लोकसहभागातून सखोल स्‍वच्‍छता मोहीम (Mumbai Deep Cleaning) राबवावी, अशाप्रकारच्या सुचना आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिल्या आहेत. मात्र, या स्वच्छतेबाबत राज्याचे मुख्यमंत्री समाधानी नसून त्यांनी मला तीन सहायक आयुक्तांना निलंबित करण्याचे निर्देशही दिल्याची सूचक धमकीही प्रशासकांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai Deep Cleaning)

मुळे मुंबईतील सार्वजनिक स्‍वच्‍छता, नागरी आरोग्‍यामध्‍ये सकारात्‍मक बदल घडत आहे. स्‍वच्‍छता मोहीम (Mumbai Deep Cleaning) ही निरंतर प्रक्रिया असून त्‍यात सातत्‍य राखायला हवे. त्‍यासाठी २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) दर शनिवारी एकाच दिवशी लोकसहभागातून सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले. स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या (Mumbai Deep Cleaning) यशस्‍वीतेसाठी सर्व विभागाच्या सहायक आयुक्तांनी आठवड्याच्‍या प्रत्‍येक सोमवारी सर्वसमावेशक बैठक घेऊन सूक्ष्‍म नियोजन करावे. अतिरिक्‍त मनुष्‍यबळ, यंत्रणाच्‍या आधारे कृती आराखडा तयार करावा, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, ख्‍यातनाम व्‍यक्‍ती, अशासकीय संस्‍था यांचा सहभाग वाढवावा, असे निर्देशही आयुक्‍तांनी दिले. (Mumbai Deep Cleaning)

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी महानगरपालिकेकडून प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात व्‍यापक स्‍तरावर सखोल स्‍वच्‍छता मोहीम (Mumbai Deep Cleaning) राबविण्‍यात येत आहे. त्या बाबतची आढावा बैठक महानगरपालिका मुख्‍यालयात गुरुवारी पार पडली. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल अध्‍यक्षस्‍थानी होते. अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) पी. वेलरासू, अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विविध सह आयुक्तासह सर्व संबंधित उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (Mumbai Deep Cleaning)

(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर दहिसरमध्ये गोळीबार)

रस्‍ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी धूळ हटवून पाण्याने धुण्‍याचे काम अव्‍याहतपणे सुरू

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनांनुसार सार्वजनिक स्‍वच्‍छतेकामी महानगरपालिका प्रभावीपणे विविध उपाययोजना राबवत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, कामगार रस्‍त्‍यावर उतरुन अहोरात्र कार्यरत आहेत. रस्‍ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी धूळ हटवून पाण्याने धुण्‍याचे काम अव्‍याहतपणे सुरू आहे. संपूर्ण मुंबई महानगरामध्ये अधिकचे मनुष्‍यबळ वापरून रस्ते स्वच्छ केले जात आहेत. रस्‍त्‍यांवर साचलेली धूळ ब्रशने स्‍वच्‍छ करण्‍यात येत आहे. त्यानंतर रस्ते पाण्याने धुण्‍यात येत आहेत. नागरी परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. मुख्‍यमंत्र्यांना अभिप्रेत स्‍वच्‍छता करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार असे सर्वांनी तत्पर राहणे, हे आपले कर्तव्य आहे. (Mumbai Deep Cleaning)

मुख्‍य रस्‍ते, महामार्ग यांबरोबरच झोपडपट्टी व तत्‍सम भाग, औद्योगिक क्षेत्र, उच्चभ्रू परिसर या विविध ठिकाणी व्‍यापक स्‍वरूपात स्‍वच्‍छता करावी. स्‍वच्‍छतेच्‍या प्रचार-प्रसारासाठी लोककलेचा वापर करावा, रस्‍तेदुभाजक, दगडी कडा यांची रंगरंगोटी करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. दरम्यान या बैठकीत आयुक्तांनी या रस्ते स्वच्छता कामांमध्ये सातत्य असणे आवश्यक असून काही सहायक आयुक्तांकडून योग्य प्रकारे याचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे तीन सहायक आयुक्तांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. परंतु आपण योग्यप्रकारे काम करावे अशी सूचनाही प्रशासकांनी केल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai Deep Cleaning)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.