Shiv Sena UBT गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात?

उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (८ फेब्रुवारी) 'X' या समाजमाध्यमावर अचानक एक पोस्ट केली. यात त्यांनी म्हटले आहे की, “शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड डाव सुरू आहे.

814
Shiv Sena UBT गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात?

शिवसेना उबाठा गटाचे (Shiv Sena UBT) उत्तर-पश्चिम (North-west) विभागातील तीन विद्यमान आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते. यात आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आणि ऋतुजा रमेश लटके (Rutuja Latke) यांच्या नावाची उघड चर्चा असून ऊबाठा पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा आहे.

(हेही वाचा – CSMT Taps Stolen : सीएसएमटी वातानुकूलित शौचालयातून नळाची चोरी; तिघांना अटक)

संजय राऊत यांची अचानक पोस्ट

उबाठा (Shiv Sena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (८ फेब्रुवारी) ‘X’ या समाजमाध्यमावर अचानक एक पोस्ट केली. यात त्यांनी म्हटले आहे की, “शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड डाव सुरू आहे.. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा.. पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक परेकरे दहशतवाद आहे.. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते.. वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत.. ते लढतील व जिंकतील.. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत.”

(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर दहिसरमध्ये गोळीबार)

अचानक केलेल्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात (Shiv Sena UBT) उलटसुलट चर्चा सुरू असून वायकर यांच्यासह अन्य काही आमदार येत्या काही दिवसांत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य –

शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांचे निकटवर्तिय यांच्याशी वायकर यांचे व्यवसायिक संबंध असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामी केंद्रीय तपास यंत्रणांना वायकर यांच्या माध्यमातून ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वायकर यांना आपल्या कंपूत ठेवण्याचा प्रयत्न दोन्हीकडून (शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे) होत असल्याचे दिसून येते. सध्या वायकर यांची ED चौकशी सुरू आहे. दोन आठवड्यापूर्वी वायकर पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

(हेही वाचा – Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत)

अन्य आमदारांची चर्चा –

असे असताना वायकर यांच्यावर राजकीय दबाव आणून, धमकावले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. उत्तर-पश्चिम या विभागातून अजून एक आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यादेखील शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असे बोलले जाते. रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोट-निवडणुकीत ऋतुजा अंधेरी-पूर्व या मतदार संघातून २०२२ मध्ये निवडून आल्या. (Shiv Sena UBT)

त्याचप्रमाणे उबाठा नेते आमदार सुनील प्रभू हेदेखील शिंदे यांच्यासोबत जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र प्रभू यांच्या निकटवर्तीयाने ही शक्यता फेटाळून लावली. (Shiv Sena UBT)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.