Abhishek Ghosalkar : मॉरिसच्या पीएसह एका व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथाकथित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

671
Abhishek Ghosalkar : मॉरिसच्या पीएसह एका व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला. रात्री घडलेल्या या घटनेत त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र होते.

(हेही वाचा – Justice Ajay Khanwilkar : देशाचे पहिले लोकपाल बनले न्यायमूर्ती अजय खानविलकर)

पैशाच्या वादातून मॉरिस (Abhishek Ghosalkar) नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. एका वर्षापूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आत्महत्या केली.

पोलिसांकडून १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त –

दरम्यान या प्रकरणी (Abhishek Ghosalkar) आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मॉरिसचा पीए मेहुल पारीख आणि रोहित साहू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे फेसबुक लाईव्हमधून समजते. तसेच मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत.

(हेही वाचा – Shiv Sena UBT गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात?)

हत्येचा गुन्हा दाखल…

अभिषेक घोसाळकरांच्या (Abhishek Ghosalkar) हत्येप्रकरणी पोलिसांकडून कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथाकथित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली असून, ही परदेशी बनावटीची पिस्तूल आहे. विशेष म्हणजे मॉरिसकडे पिस्तुलाचा परवाना देखील नव्हता असे सांगण्यात येत आहे. एमएचबी पोलिसांकडून हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.