अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणानंतर सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट आणि शिवसेना एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. महाविकास आघाडी कडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आणि आपल्या पक्षाची बाजू मांडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली.
(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : मॉरिसच्या पीएसह एका व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात)
काय म्हणाले उदय सामंत ?
बोरीवलीत गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्री एक गोळीबाराची घटना घडली. घोसाळकर यांचे निधन झालं, ही घटना दुर्दैवी आहे. अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठीशासन कडक पाऊले उचलणार आहे. काल जे फेसबूक लाईव्ह झाले त्यात काय काय उल्लेख झाले हे सगळ्यांनी पाहिलं. भविष्यात एकत्रित काम करण्याची दोघांनीही शपथ घेतली.(Uday Samant)
(हेही वाचा – Haldwani Madarsa Demolition : आतापर्यंत ४ ते ६ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा अधिक पोलीस जखमी)
मॉरिसला ‘सामना’तून मोठं केलं गेलं
.
.
.#Udaysamant #Lokshahimarathi #saamna #Maharashtrapolitics #Abhishekghosalkar #maurisnoronha pic.twitter.com/m8v79EBGpo— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 9, 2024
पुढे बोलताना सामंत म्हणाले की;
अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिसचे उदात्तीकरण ‘सामना’ वृत्तपत्रातून झाले. ‘सामना’मध्ये आलेल्या एका बातमीत म्हटले की, ‘कफ परेड ते शिर्डी ११५ दिवसांचा मदत यज्ञ’, अशा अनेक बातम्या मॉरिसच्या सामन्यातून प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच मॉरिस याने अनेक वेळा ट्विट करुन आपले नेते कोण आहेत, आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे, हे सांगितले आहे. फेसबूक लाईव्हमध्ये त्यांनी आपणास उबाठा शिवसेना मोठी करायची आहे. महिलांसाठी एकत्र काम करायचे आहे. उबाठा शिवसेना वाढवायची आहे, असे म्हटले होते.(Uday Samant)
हा उबाठा गटातील गँगवार –
सामनाने मॉरिसला मोठे केले तर घोसाळकर यांच्या कामांना मातोश्रीवरून पाठिंबा होता. या दोघांमधील वाद म्हणजे उबाठा गटातील गँगवार आहे. मी नगरसेवक होणार की तू यावरुन त्यांच्यात वाद होता. फेसबूक लाईव्हमध्ये जी तडजोड झाली त्या मागे कोण आहेत. त्यांना तडजोड करण्यास सांगणारे कोण आहेत, हे तपास यंत्रणेने समोर आणले पाहिजे. त्यांची मिटींग का ठरली, कशी ठरली, कोणी ठरवली, कशासाठी झाली ? याची चौकशी झाली पाहिजे. या दोघांशी ज्यांचे संबंध होते, त्यांची चौकशी झाली पाहिजे. (Uday Samant)
विनाकारण मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे – उदय सामंत
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मुख्यंत्र्यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. त्याऐवजी मॉरिस नोरान्हो आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण,याचा शोध घेतला पाहिजे. या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते? घोसाळकर आणि नोरान्हो यांच्यात समझोता झाला होता. मात्र, हे दोघे आमचे कार्यकर्ते नव्हते. या दोघांनी उबाठामध्ये एकत्र काम करुन पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांनी तपास करताना लक्षात घेतली पाहिजे. फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कोणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही उदय सामंत (Uday Samant) यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community