मुंबईतील दहिसर परिसरातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा (Maurice Noronha) या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) प्रकरणी प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी, “लोकांच्या डोक्याला झालंय तरी काय? मला कळत नाही, फेसबुक लाईव्ह करतात आणि अशा घटना घडतात. यात पोलीस तरी काय करणार? असा सवाल उपस्थित केला आहे. जर चोऱ्या. दंगल अशा घटना घडत असतील तर त्यात पोलीस संरक्षण (Police protection) देत असतात, इथं तुमच्या घरात येऊन अशा घटना घडतात. पोलिसांनी बंदूक लायसन्स देताना अधिक काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. (Abhishek Ghosalkar)
भुजबळ (Chhagan Bhujbal) पुढे म्हणाले की, अनेक वाम मार्गाने जाणारे, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना बंदूक देऊ नये. मॉरिस जेलमध्ये होता, त्याच्याकडं बंदूक कसे आलेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यात काय करू शकतात. राजीनामा मागणी चुकीचे आहे. आतंकवाद, दंगे, चोऱ्या अशा ठिकाणी गृहमंत्री काळजी घेऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. (Abhishek Ghosalkar)
(हेही वाचा – Devendra Fadnavis : ‘गाडीखाली कुत्रं आलं तरी …’; घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया)
कोण होते अभिषेक घोसाळकर?
अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. अभिषेक हे मुंबईतील दहिसरच्या वार्ड क्रमांक एकचे माजी नगरसेवक होते. तसेच ते मुंबै बँकेचे संचालक देखील होते. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या देखील माजी नगरसेविका आहेत. बोरीवली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबाची राजकीय ताकद आहे. (Abhishek Ghosalkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community