- ऋजुता लुकतुके
स्पर्धात्मक क्रिकेटमधून जवळ जवळ गायब झालेला भारताचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) बडोद्यातील रिलायन्स स्टेडिअममध्ये क्रिकेटचा सराव करत असल्याचं समजतंय. मागचे काही आठवडे तो इथं आहे. आणि किरण मोरे अकॅडमीत सराव करत असल्याचं क्रिकबझ या वेबसाईटने म्हटलं आहे. (Ishan Kishan)
तिथे तो एकटा नाहीए. तर हार्दिक आणि कृणाल पांड्या हे भाऊही इशानबरोबर तिथेच तयारी करत आहेत. हार्दिक पांड्या आणि इशान किशन (Ishan Kishan) हे मुंबई इंडियन्स या एकाच फ्रँचाईजीचे सध्या सदस्य आहेत. गुजरात टायटन्स सोडून अलीकडेच हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. आणि यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) तो मुंबईचं नेतृत्वही करणार आहे. आणि ही फ्रँचाईजी रिलायन्स समुहाच्याच मालकीची आहे. त्यामुळे दोघं एकत्र आणि रिलायन्सच्या क्रिकेट मैदानावरच सराव करत आहेत. (Ishan Kishan)
Ishan Kishan has been practice and training since the last two weeks at the Kiran More Academy in Baroda. (Cricbuzz) pic.twitter.com/gSPlyga5au
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 7, 2024
(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : “लोकांच्या डोक्याला झालंय तरी काय? मला कळत नाही” – छगन भुजबळ)
बीसीसीआयकडून इशानला मिळतात इतके रुपये
नोव्हेंबर २०२३ पासून इशान किशन (Ishan Kishan) स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. तेव्हाच तो भारतीय संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेत गेला होता. पण, टी-२० मालिकेनंतर तो एकदिवसीय मालिकेदरम्यान बीसीसीआयची परवानगी घेऊन भारतात परतला. मानसिक थकव्याचं कारण देत त्यानंतर तो रणजी स्पर्धेतही सहभागी झालेला नाही. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वेळोवेळी संघ निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आधी स्वत:ला सिद्ध करण्याचे निर्देश दिलेले असतानाही, इशान (Ishan Kishan) स्थानिक क्रिकेट खेळलेला नाही. (Ishan Kishan)
त्यामुळे सुरुवातीच्या मानसिक थकव्यासाठीच्या ब्रेकनंतरही तो देशांतर्गत क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे निवडीसाठी तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. या सगळ्यामुळे क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याबद्दलही संदिग्धता निर्माण झाली आहे. सध्या खेळाडूंबरोबरच्या करारात किशन (Ishan Kishan) सी ग्रेडच्या करारात मोडतो. त्यामुळे त्याला वर्षाला १ कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतात. पण, तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला नाही तर बीसीसीआय (BCCI) त्याच्याबरोबरचा करार कायम ठेवेल की, तो बंद करण्यात येईल याबद्दलही बरीच उलट सुलट चर्चा रंगली आहे. किशन आताही सराव करत असला तरी देशांतर्गत क्रिकेट तो कधी खेळणार याबद्दल त्याने कुठलंही भाष्य केलेलं नाही. (Ishan Kishan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community