- ऋजुता लुकतुके
नो कागन हा तरुण २२ वर्षांचा होता तेव्हा फेसबुकने (Facebook) त्याला काढून टाकलं होतं. आता तो ४१ वर्षांचा आहे. आणि वर्षाला २१ कोटी रुपये मिळवत आहे. ॲपसुमो या त्याच्या कंपनीचा तो सहसंस्थापक आहे. सीएनबीसी वाहिनीने त्याच्यावर एक फिचर प्रसिद्ध केलं आहे. आणि त्यानुसार निर्वासित अमेरिकन असलेला कागन फेसबुक (Facebook) बरोबरच इंटेल आणि मिंट या कंपन्यांमध्येही कामाला होता. (I Just Want Money)
‘मी कधीच पैसे खर्च केले नाहीत. मला ते कायम साठवायचे होते. चाळीशीत आल्यावर मी पहिल्यांदा पैसा खर्च करण्यात आनंद घेऊ लागलो,’ असं त्याने सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. कागनचे वडील इस्त्रायलमधून अमेरिकेत आले. आणि त्यांना इंग्लिशही बोलता यायचं नाही. सुरुवातीला ते कॉपिअर घरा घरांत जाऊन विकत आणि त्यातूनच पैसे कमावत. कागनची आई परिचारिका म्हणून काम करत होती. पण, त्याचे सावत्र वडील अभियंता होते. तिथून त्याचा टेक क्षेत्राशी संबंध आला. (I Just Want Money)
(हेही वाचा – Ishan Kishan : क्रिकेटमधून ‘गायब’ असलेला इशान किशन बडोद्यात करतोय सराव)
गेल्यावर्षी त्याच्या कंपनीने केली इतकी कमाई
लहानपणी पैशासाठी कंजूष असलेला कागन आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि सुट्यांवर मात्र खर्च करतो. ‘माझा पगार मी सगळ्यात शेवटी ठरवतो. मी वर्षाला २ लाख अमेरिकन डॉलर इतकाच पगार घेतो. पण, वर्षाच्या शेवटी कर्मचाऱ्यांची सगळी देणी देऊन झाली आणि त्यांना भरपगारी, सर्व खर्च कंपनीकडून असलेली सुटी देऊन झाली की, मग मी उर्वरित पैसे संचालक मंडळात वाटतो,’ असं कागन यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्यावर्षी त्याच्या कंपनीने ८० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी कमाई सेल्समधून केली. (I Just Want Money)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community