हुंसूर कृष्णमूर्ती (Hunsur Krishnamurthy) हे कन्नड चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव. ते नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, पटकथा लेखक आणि गीतकार होते. एका शरीरात वसलेले विविध अवतार म्हणावे लागतील. सुरुवातीच्या काळात त्यांनी गुब्बी वीरान्ना, मोहम्मद पीर आणि बी.आर. पंथुलू अशा दिग्गज नाट्य कलाकारांसोबत काम केले. कृष्णमूर्ती नाटककार म्हणून काम करू लागले.
त्यानंतर ते बंगळुरूस्थित भारत नाटक कंपनीत नाटककार म्हणून काम करू लागले आणि पुढे त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये पटकथाकार म्हणून काम केले. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून, त्यांनी सत्य हरिश्चंद्र, भक्त कुंभार, बब्रुवाहन यासारखे पौराणिक चित्रपट केले. या सर्व चित्रपटांमध्ये सुपरस्टार राजकुमार यांनी अभिनय केला. हे चित्रपट प्रचंड गाजले आणि राजकुमार हे नाव आदराने घेतले जाऊ लागले.
(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : “लोकांच्या डोक्याला झालंय तरी काय? मला कळत नाही” – छगन भुजबळ)
त्यानंतर त्यांनी मराठी अभिनेते बालगंधर्व (Marathi actor Balgandharva) यांच्या नाट्य मंडळात काम केले. त्या काळात, त्यांनी प्रसिद्ध कन्नड नाट्य कलाकार गुब्बी वीराण्णा (Famous Kannada theater actor Gubbi Veeranna) आणि मोहम्मद पीर (Mohammad Pir) यांच्यासोबतही काम केले. त्यांच्या सत्य हरिश्चंद्र (Satya Harishchandra) या चित्रपटाने १३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कन्नडमधील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आणि कन्नड चित्रपटसृष्टीला नवी ओळख मिळवून दिली.
१९७७ मध्ये आलेला त्यांचा वीरा सिंधुरा लक्ष्मण (Veera Sindhura Laxman Movie) हा चित्रपट, जो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांशी लढा देणारे स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारित होता, या चित्रपटाला प्रचंड यश लाभले. अनेक अभिनेत्यांची कारकीर्ददेखील त्यांनी घडवली आहे. आपल्या कारकिर्दीत ते अत्यंत यशस्वी कलाकार होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community