Indian Army Agniveer Recruitment 2024: अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू, कसा कराल अर्ज ? वाचा सविस्तर

573
Modi 3.0 : अग्निवीर योजना खरंच रद्द झाली तर संरक्षण खर्चावर काय परिणाम होणार?

भारतीय सैन्यात काम करून देशसेवा (Indian Army Agniveer Recruitment 2024) करण्याची ज्यांची ईच्छा आहे, त्यांनी ही बातमी शेवटपर्यंत वाचावी; कारण भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २१ मार्चपर्यंत अर्ज करावेत. अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत बेवसाईट joinindianarmy.nic.inवर जाऊन अर्ज करू शकतात.

(हेही वाचा – Hunsur Krishnamurthy: कन्नड सिनेसृष्टीतले दिग्गज कलाकार )

वय श्रेणी
या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांचे वय १७ ते २१ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

प्रवेश शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ५५० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज कसा करायचा 
सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाइटवर) जावे. त्याच्या होम पेजवर, jCO/OR/Agniveer Applyच्या लिंकवर किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगिन करा. त्यानंतर अग्निवीर लॉगिन पेज उघडेल. यानंतर नोंदणी लिंकवर .
आता फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया सुरू करा. शेवटी, फी ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट घ्या.

निवड प्रक्रिया  
भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणीत बसतील. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर पुन्हा मेडिकल होईल.या सर्व टप्प्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.