Rape Accused Varun Kumar : बलात्काराचा आरोपी असलेल्या वरुण कुमारची हॉकी लीग स्पर्धेतून माघार

हॉकीपटू वरुण कुमारने कायदेशीर लढाई लढण्याची तयारी चालवली आहे. 

178
Varun Kumar Rape Allegation : हॉकीपटू वरुण कुमारवर राष्ट्रीय कोच फलटन काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

बलात्काराचा आरोप असलेला आणि बंगळुरू पोलिसांनी (Bangalore Police) पॉक्सो (POCSO) अंतर्गत चौकशी सुरू केलेला भारतीय हॉकीपटू वरुण कुमारने (Varun Kumar) हॉकी प्रो लीगमधून माघार घेतली आहे. कायदेशीर लढाईची जुळवाजुळव करण्यासाठी त्याने हॉकी फेडरेशनकडे वेळ मागून घेतला आहे. त्याचवेळी ‘पैसे उकळण्याच्या हेतूने आपल्या विरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचा’ दावा त्याने केला आहे. २८ वर्षीय वरुणला (Varun Kumar) हॉकी इंडियाने तातडीची रजा मंजूर केली आहे. मानसिक आणि शारीरिक तणावाखाली असलेल्या वरुणने वैयक्तिक समस्येकडे आधी लक्ष द्यावं असं त्याला सांगण्यात आलं आहे. (Rape Accused Varun Kumar)

वरुण (Varun Kumar) हा भारतीय हॉकी संघातील बचाव फळीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. २०२१ मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर २०२० च्या ऑलिम्पिक कांस्य पदकविजेत्या संघाचा तो सदस्य आहे. पण, या महिन्याच्या सुरुवातीला बंगळुरूमधील एका मुलीने त्याच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. बलात्कार झाला तेव्हा ती अल्पवयीन होती, असं सांगत पॉक्सो (POCSO) या कडक कायद्याअंतर्गत तिने दाद मागितली आहे. बंगळुरू पोलीस (Bangalore Police) या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हा आरोप झाला आणि गुन्हा दाखल झाला तेव्हा वरुण कुमार भुबनेश्वर इथं भारतीय संघाबरोबर सराव शिबिरात होता. तिथून आता त्याने थेट आपलं हिमाचल प्रदेशमधील गाव गाठलं आहे. लवकरच बंगळुरूला जाऊन तो कायदेशीर लढाई लढणार आहे. (Rape Accused Varun Kumar)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या पदकांमध्ये असणार आयफेल टॉवरचा अंश)

बलात्काराचा आरोप खोटा – वरुण कुमार

‘एका खोट्या आणि निराधार प्रकरणात महिलेनं मला उगाचच गोवलं आहे. या मुलीबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होतो हे खरं आहे. पण, बलात्काराचा आरोप खोटा आहे. मीडियाकडूनच मला तिच्या आरोपांविषयी आणि पोलीस तक्रारीविषयी समजलं. अजून पोलिसांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. पण, मीच हे प्रकरण त्यांच्याकडून समजून घेणार आहे. आणि बचावाचे प्रयत्न करणार आहे,’ असं वरुणने भुबनेश्वर इथं मीडियाशी बोलताना सांगितलं. ही त्याची (Varun Kumar) प्रकरणानंतरची पहिली प्रतिक्रिया होती. हॉकी इंडियातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला दोघांची ओळख झाली तेव्हा बंगळुरूतील साई केंद्रात होती. आणि तेव्हा ती १७ वर्षांची व्हॉलीबॉलपटू होती. तिथेच दोघांची ओळख झाली आणि दोघं जवळ आले. पण, सध्या ही मुलगी खेळापासून दूर असून ती एअर होस्टेस म्हणून काम करते. वरुणने (Varun Kumar) दोघांमधील नातं एकतर्फी संपवलं. आणि तो तिच्या फोन कॉलना उत्तर देत नसल्याचा आरोप महिलेनं केलाय. तर आपल्या विरुद्ध खंडणी वसूल करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न असल्याचा वरुण कुमारचा दावा आहे. (Rape Accused Varun Kumar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.