उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) नुकतेच समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे. येथील हल्दवानी येथेही एका बेकायदेशीर मदरशावर बुलडोझर चालवण्यात आला. यामुळे हल्दवानी येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. तेथे शूट अॅट साईट आदेश देण्यात आले आहेत. (Tablighi Ijtema)
उत्तरप्रदेशमध्ये ज्ञानवापीमध्ये पूजा चालू झाल्यानंतर मौलाना तौकिर रझा खान (Maulana Tauqeer Raza Khan) यानेही ‘आमच्यावर आक्रमण करणाऱ्यांना ठार करू’, अशी धमकी दिली आहे. अशातच आता १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत ओडिशातील (Orisa) जाजपूर जिल्ह्यातील बिंझारपूर येथे तबलिगी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – MNS President Raj Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्यायला हवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी)
सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष द्यावे
या इज्तेमाच्या कारणाने ओडिशामध्ये लाखो मुसलमान संघटित होणार आहेत. सध्या धर्मांधांमुळे उत्तर भारतात आधीच वातावरण तणावपूर्ण बनले असतांना ओडिशामध्ये होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाकडे सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात याच तबलिगी जमातीच्या लोकांनी देशाच्या विविध भागांत प्रवास केला होता. त्यांच्यामुळे देशभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, असेही म्हटले जात होते. तसेच तेव्हा तबलिगी जमातीचे (Tablighi Jamaat) सदस्य हे मोठ्या रोषाचे कारण ठरले होते. (Tablighi Ijtema)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community