छत्रपतींच्या घरात भांडणे लावण्याचा Mahavikas Aghadi चा प्रयत्न?

महाविकास आघाडी छत्रपतींच्या घरात भांडणे लावण्याच्या प्रयत्नात आहे का? असा सवाल केला जात आहे.

316
मुंबईत मेरिटनुसार ठरणार विधानसभेचे जागावाटप; Mahavikas Aghadi च्या बैठकीत निर्णय

महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गेल्या आठवड्यात छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांना सहाव्या म्हणजेच शेवटच्या राज्यसभा (Rajya Sabha) जागेसाठी उमेदवारी देऊन बिनविरोध निवडून आणावे, असे आवाहन केले. त्यावर त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले गेले. अनेकांनी तर छत्रपती संभाजीराजे यांचा मागच्या राज्यसभा निवडणुकीत कसा अपमान केला यांची आठवण करून दिली. शिवसेना उबाठाने संभाजीराजे (Sambhaji Raje) यांना शिवबंधन बांधून घ्यावे तरच त्यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल, अशी अट घातली होती. काहींनी तर शेवटच्या जागेसाठी का? पहिल्या जागेसाठी छत्रपती शाहुंना उमेदवारी का नाही? असा सवालाही X वर केला. (Mahavikas Aghadi)

सहा जागा रिक्त

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत असल्याने त्या जागा रिक्त होत आहेत. यासह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातून शिवसेनेचे (आताचा उबाठा पक्ष) अनिल देसाई (Anil Desai), भाजपचे प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar), नारायण राणे (Narayan Rane) आणि व्ही. मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर (Kumar Ketkar) आणि राष्ट्रवादीच्या (आताचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) वंदना चव्हाण या सहा खासदारांच्या जागा रिक्त होत आहेत. (Mahavikas Aghadi)

(हेही वाचा – BMC : रहिवासी संस्थांच्या माध्यमातून १ हजार टन कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे महापालिकेचे ध्येय)

काँग्रेसची भूमिका काय?

राज्यसभेतील या सहा जागांपैकी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) फक्त एक उमेदवार निवडून येईल, इतकीच मते तिन्ही पक्षांची, (काँग्रेस, ऊबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) मिळून आहेत. त्यात काँग्रेसचा एक उमेदवार आणून उर्वरित मतांवर छत्रपती शाहू महाराज यांना सर्वपक्षीयांनी निवडून आणावे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. अद्याप काँग्रेस पक्षाने याबाबत भूमिका जाहीर केली नाही. तर छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे हे इच्छुक असतानाही त्यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडी तोंडावर बोट ठेऊन आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या हेतुवरच संशय व्यक्त केला जात आहे. (Mahavikas Aghadi)

..आणि अलिप्त झाले

१ फेब्रुवारीला संभाजीराजे यांनी X वर एक संदेश पोस्ट केला. त्यात त्यांनी म्हटले की, “स्वराज्य पक्ष असतांना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे ‘स्वराज्य’ असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.” या पोस्टनंतर त्यांना काँग्रेस, मनसे, भाजप अशा विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उस्फूर्त पाठिंबा देत आपापल्या पक्षातर्फे निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. तर त्याच दरम्यान उबाठा पक्षाने एक प्रस्ताव शाहू महाराज यांना दिल्याने कौटुंबिक वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २ फेब्रुवारीपासून त्यांनी समाजमाध्यमांवर आणि सार्वजनिक जीवनापासुन अलिप्त झाले, तसेच नियोजित कार्यक्रमदेखील रद्द केले. “काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम वा दौरे रद्द करण्यात आलेले आहेत, क्षमस्व!” असा संदेश असलेली पोस्ट त्यांनी केली. (Mahavikas Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.