Bharat Petroleum Corporation ltd: ‘बीपीसीएल’ची नवीन योजना लॉंच, जाणून घ्या फायदे…

डिलिव्हरी सूचना, रिअल टाइम ट्रॅकिंग, ओटीपी आधारित डिलिव्हरी आणि पसंतीचे स्लॉट बुकिंग यांसारख्या फिचरसह, प्युअर फॉर शुअर उत्तम सेवेचा अनुभव देणार आहे.

400
Bharat Petroleum Corporation ltd: 'बीपीसीएल'ची नवीन योजना लॉंच, जाणून घ्या फायदे...
Bharat Petroleum Corporation ltd: 'बीपीसीएल'ची नवीन योजना लॉंच, जाणून घ्या फायदे...

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation ltd.) आता आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवी योजना लाँच करणार आहे. या योजनेचे नाव ‘प्युअर फॉर शुअर’ आहे, याद्वारे ग्राहकांना वेळेत, योग्य वजनाचे सिलेंडर मिळणार आहे. सिलेंडर डिलिव्हरी घेण्यापूर्वी ग्राहक सिलेंडर तपासू शकतील. भारत गॅसने सुरू केलेली ही सेवा देशातील अशा प्रकारची पहिली सेवा आहे. ही सेवा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गोवा येथे आयोजित IEW 2024 मध्ये सुरू केली.

बीपीसीएलने या सेवेबाबत सांगितले की, ‘प्युअर फॉर शुअर’च्या मदतीने ग्राहकांना योग्य सिलिंडर मिळू शकतील. या योजनेंतर्गत सिलिंडरवर छेडछाड प्रतिबंधक सील बसवले जाईल. यात QR कोड असेल. QR कोड स्कॅन केल्यावर, ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह प्युअर फॉर शुअर पॉप अप दिसेल. सिलिंडरचे वजन यासारखे अनेक महत्त्वाची माहिती यात दिसेल. यामुळे ग्राहकांना डिलिव्हरी घेण्यापूर्वीच सिलिंडर तपासता येणार आहे. सिलेंडरमध्ये छेडछाड झाल्यास, QR कोड स्कॅन केला जाणार नाही यामुळे वितरणही होणार नाही.

(हेही वाचा – Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून बाबा सिद्दीकी राज्यसभेवर? तर भाजपचा चौथा उमेदवार पटेल?)

रूट ऑप्टिमायझर सेवा
या सेवेचा ग्राहक आणि एजन्सीलाही फायदा होणार आहे. बीपीसीएलच्या एमडींनी सांगितले की, बीपीसीएलच्या ‘प्युअर फॉर शुअर’ योजनेमुळे एलपीजी सेवेत मोठा बदल होणार आहे. यामुळे सिलिंडरच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास वाढेल. ट्रान्झिटमध्ये गॅस सिलिंडरची चोरी, डिलिव्हरीच्या वेळी ग्राहकांची उपस्थिती आणि रिफिल डिलिव्हरीसाठी वेळेची निवड यासारख्या समस्या सोडवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ‘प्युअर फॉर शुअर’अंतर्गत एआय आधारित रूट ऑप्टिमायझर सेवा देखील उपलब्ध असेल. यामुळे एजन्सीची वितरण क्षमता वाढेल.

काही नवीन फिचर्स…
कंपनीला डिलिव्हरीमध्ये महिलांनाही सहभागी करून घ्यायचे आहे. शिवाय, डिलिव्हरी सूचना, रिअल टाइम ट्रॅकिंग, ओटीपी आधारित डिलिव्हरी आणि पसंतीचे स्लॉट बुकिंग यांसारख्या फिचरसह, प्युअर फॉर शुअर उत्तम सेवेचा अनुभव देणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.