आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून विश्रामबाग पोलीस ठाणे आणि डेक्कन क्वीन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येईल”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
पुण्यात राष्ट्रीय सेवा दलातर्फे ‘निर्भय बनो’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. (Nirbhay Bano Pune)
(हेही वाचा – Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत भारतात असणार जगातील सर्वाधिक मतदार)
सुरक्षाही पुरवली होती
मी हे जबाबदारीने सांगू शकतो की या कार्यक्रमाला परवानगी नव्हती. परंतु, निखिल वागळे येणार असल्याने आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. कारण, त्यांच्यावर कालच पुणे शहरांत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्याविरोधात वातावरण असल्याची कल्पना आम्ही त्यांना आधीच दिली होती. त्यांच्यासाठी सुरक्षाही पुरवली होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लालकृष्ण आडवाणी यांच्यावर केली होती टीका
निखिल वागळे यांनी नुकतेच माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना मिळालेल्या भारतरत्न पुरस्कारावर खालच्या स्तरावर टीका केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर शाईफेक केली, तसेच गाडीच्या काचाही फोडल्या.
याविषयी पुणे पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पोलीस अधिकारी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा दलाने आयोजित केलेल्या निर्भया बनो कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. निखिल वागळे त्यांच्या खासगी गाडीतून निघाले. त्यांनी पोलीस सुरक्षा घेतली नाही. ते कार्यक्रम स्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केली. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून विश्रामबाग पोलीस ठाणे आणि डेक्कन क्वीन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येईल.
निखिल वागळे यांना विरोध करण्यासाठी सभास्थळाच्या बाहेरही सायंकाळपासून भाजप बरेच कार्यकर्ते जमा झाले होते. या वेळी वागळे यांच्या कार्यकर्त्यांनीही सरकारविरोधी घोषणाबाजी केली. (Nirbhay Bano Pune)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community