दुर्गा भागवत (Durga Bhagwat) यांचा जन्म १० फेबुवारी १९१० मध्ये तत्कालीन बडोदा संस्थानात एका कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते राजाराम शास्त्री भागवत हे त्यांच्या आजीचे भाऊ होते. विशेष म्हणजे त्यांची बहीण कमला सोहोनी भारतातील पहिली महिला शास्त्रज्ञ झाली होती. त्यांचे वडीलदेखील शास्त्रज्ञ होते. त्यांची खासियत म्हणजे त्यांनी तेलापासून तूप बनवण्याची पद्धत शोधली होती.
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या
अशा सुसंस्कृत वातावरणात दुर्गा भागवत लहानाच्या मोठ्या झाल्या. सुरुवातीच्या काळात दुर्गाबाई (Durga Bhagwat) गांधींच्या प्रेरणेने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या. मात्र फार काळ त्या या चळवळीत राहिल्या नाहीत. पुढे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या मध्य प्रदेशात गेल्या, तिथे त्यांना यम ही विचित्र रिऍक्शन झाली, ज्यामुळे त्या सहा वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. म्हणून त्यांना डॉक्टरेटचा अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही.
(हेही वाचा Uttarakhand UCC : समान नागरी कायद्याच्या विरोधात उत्तराखंडात ‘शाहीन बाग’ची पुनरावृत्ती होणार?)
महाभारताच्या अभ्यासावर आधारित व्यासपर्व हे पुस्तक खूप गाजले
१९७५ मध्ये कराड येथे झालेल्या ५१ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गा भागवत (Durga Bhagwat) यांची निवड झाली. दुर्गा भागवत यांनी राजाराम शास्त्री भागवत यांचे चरित्र लिहिले आहे, तसेच पैस – यामध्ये धर्माविषयीचे लेख आहेत आणि त्यांच्या महाभारताच्या अभ्यासावर आधारित व्यासपर्व हे पुस्तक खूप गाजले. त्यांचा व्यासंग खूप मोठा होता. त्यांनी धार्मिक साहित्याचा, विशेषत: बौद्ध व ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंतच्या मराठी संतांच्या कार्यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर व्यास आणि आदि शंकराचार्यांच्या प्रमुख संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला.
इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला त्यांनी विरोध केला. आणीबाणी उठल्यानंतर, १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रचार केला आणि आयुष्यभर त्या कॉंग्रेसच्या विरोधक राहिल्या आहेत. पुढे कोणताही राज्य प्रायोजित सन्मान न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार नाकारला होता.
Join Our WhatsApp Community