Indian Army : भारतीय सैन्यात भरती व्हायचंय? मग तुमची उंची ’एवढी’ हवी!

774
हिंदुंचे सैनिकीकरण अशी हाक सावरकरांनी दिली होती. त्यावेळेस अनेक हिंदू तरुण सैन्यात भरती झाले. आज भारत हा सक्षम देश आहे. आता अनेक मुलांना सैन्यात भरती (Indian Army) व्हायचं वाटतं. पण त्यासाठी काही मूलभूत नियम आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं हवं. भारतीय लष्करामध्ये सैनिक म्हणून भरती व्हायचे असेल तर किमान उंची (Indian Army Height Standards), छातीचा माप आणि विशिष्ट वजन असावे लागते.
लक्षात घ्या, भारतीय सैन्यासाठी (Indian Army)  किमान उंचीची (indian army height) आवश्यकतेचे निकष प्रदेश आणि श्रेणीनुसार बदलतात. सामान्यतः भारतीय सैन्य अग्निवीर सैनिक जनरल ड्यूटी (GD) श्रेणीसाठी, पुरुषांसाठी किमान उंची १६० सेमी आणि महिलांसाठी १५७ सेमी इतकी आहे. मात्र भिन्न प्रदेश आणि श्रेणींमध्ये उंचीचे निकष बदलू शकतात.
तर आता प्रश्न आहे की छातीचा माप किती असावा. पुरुष उमेदवारांसाठी छाती किमान ७७ सेमी (३० इंच) आणि किमान ५ सेमी (२ इंच) रुंद असायला हवी. याचा अर्थ छातीचा आकार सामान्य स्थितीत कमीतकमी ७७ सेमी असावा आणि श्वास घेताना किमान ८२ सेमी (३२ इंच) पर्यंत हा आकार वाढायला हवा. महिलांसाठी छातीचा आकार भिन्न असतो आणि विशिष्ट निकष भरती करताना कळवला जातो.
आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि विशिष्ट प्रदेश, श्रेणीसाठी या आवश्यकतांमध्ये बदल होऊ शकतो. तर महिलांसाठी वजनाचा निकष भिन्न असतो आणि सामान्यत: BMI कॅल्क्युलेशनवर आधारित असतो. पुरुषांच्या बाबतीत मात्र ४८ ते ५० किलो हा निकष ठेवला जातो. मात्र यातही बदल होऊ शकतो. तर आम्हाला आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.