Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता

श्रेयस अय्यरला पाठीचं दुखणं आणि जांघेतही दुखापत झाली आहे. 

248
Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता
Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ (Indian team) इंग्लंडच्या बॅझ-बॉल रणनीतीबरोबरच खेळाडूंच्या दुखापतींशीही झगडतो आहे. के एल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरले की नाही हे अजून स्पष्ट नाहीए. आणि अशातच मधल्या फळीतील श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पाठदुखीने डोकं वर काढलं आहे. वर त्याला जांघेची दुखापतही जडली आहे. (Ind vs Eng Test Series)

इंडियन एक्सप्रेस मधील एका बातमीनुसार, श्रेयर अय्यरला (Shreyas Iyer) खेळपट्टीवर फॉरवर्ड राहून खेळताना पाठदुखीही जाणवत आहे. आणि जांघेतही दुखत आहे. त्यामुळे उर्वरित मालिकेला तो मुकण्याची शक्यता आहे. निवड समितीसमोरही हे नवं आव्हान उभं राहिलं आहे. कारण, आधीच रवींद्र जडेजा आणि राहुल यांच्या तंदुरुस्तीवर फीजिओंनी शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यातच श्रेयसची (Shreyas Iyer) दुखापत आणि विराट कोहलीची अनुपलब्धता. (Ind vs Eng Test Series)

(हेही वाचा – Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा आणि वडिलांमधील वाद नेमका काय आहे?)

विराट कोहलीही तिसरी कसोटी खेळणार नाही

यामुळेच संघ निवडीला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीला राजकोट इथं सुरू होणार आहे. पण, उर्वरित कसोटी मालिकेसाठीचा भारतीय संघ (Indian team) अजूनही निवडला गेलेला नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या मुंबईत परतला आहे. आणि इथून तो वैद्यकीय सल्ल्यासाठी बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत जाणार असल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलं आहे. आणि तो उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही, हे जवळ जवळ निश्चित असल्याचं यात म्हटलंय. (Ind vs Eng Test Series)

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पहिल्या दोनही कसोटींत चौथ्या क्रमांकावर खेळला. पण, तो चांगल्या फॉर्ममध्ये नाहीए. आणि पहिल्या कसोटीत तर चांगला जम बसलेला असताना खराब फटका खेळून तो ३४ धावांवर बाद झाला. श्रेयस (Shreyas Iyer) बरोबरच विराट कोहलीही (Virat Kohli) तिसरी कसोटी खेळणार नाही, हे जवळ जवळ स्पष्ट आहे. पण, राहुल आणि जडेजा संघात परततील असा अंदाज आहे. भारत विरुद्ध इंग्लंड ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली होती. पण, भारताने दुसरी विशाखापट्टणम कसोटी १०६ धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. तिसरी कसोटी राजकोट तर चौथी आणि पाचवी कसोटी अनुक्रमे रांची आणि धरमशालाला होणार आहेत. (Ind vs Eng Test Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.