Ind vs Eng Test Series : इंग्लंड विरुद्ध उर्वरित ३ कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर

अपेक्षेप्रमाणेच विराट कोहली अनुपलब्ध आहे तर श्रेयस अय्यरही खेळणार नाही. 

299
Ind vs Eng 5th Test Preview : ३ फिरकी गोलंदाज खेळवायचे की, ३ तेज गोलंदाज?
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित ३ कसोटींसाठी भारतीय संघ (Indian Team) जाहीर करण्यात आला आहे. आणि ही संघ निवड अपेक्षित अशीच आहे. विराट कोहली (Virat Kohli) उर्वरित ३ कसोटींसाठीही उपलब्ध नाही, यावर बीसीसीआयने (BCCI) अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. तर श्रेयस अय्यरही चर्चा होती त्याप्रमाणे पाठदुखीमुळे मालिकेत खेळू शकणार नाहीए. के एल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश सध्या संघात करण्यात आला असला तरी दुखापतीतून वेळेवर सावरले तरंच त्यांना खेळता येईल. आकाशदीप हा एकमेव नवीन चेहरा या संघात आहे. (Ind vs Eng Test Series)

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी संघ निवड जाहीर करताना ‘विराट कोहली उर्वरित मालिकेलाही वैयक्तिक कारणांमुळे मुकणार असून त्याच्या खाजगी आयुष्यातील गोपनीयतेचा बीसीसीआय (BCCI) आदर करतं,’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर के एल राहुल आणि रवींद्र जडेजा यांना अजून क्रिकेट अकादमीतील फिजिओंकडून तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. पण, ते मिळालं तरंच दोघं संघात सहभागी होतील, असंही बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केलं आहे. सर्फराझ खान आणि दुसऱ्या कसोटींत संघात पदार्पण करणारा रजत पाटिदार संघात कायम आहेत. मोहम्मद सिराजही खेळण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे आवेश खानला संघातून रजा देण्यात आली आहे. (Ind vs Eng Test Series)

(हेही वाचा – Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता)

विशेष म्हणजे आकाशदीप या बिहारच्या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान मिळालं आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आकाशदीपने १०३ बळी मिळवले आहेत. तर ४१२ धावाही केल्या आहेत. तेज गोलंदाज आणि फलंदाजीची क्षमता असलेला हा खेळाडू आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. भारत आणि इंग्लंड दरम्यानची तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोट इथं तर चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांची आणि पाचवी कसोटी ७ मार्चपासून धरमशालाला सुरू होणार आहे. (Ind vs Eng Test Series)

उर्वरित कसोटींसाठी भारतीय संघ,

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, के एल राहुल, रजत पाटिदार, सर्फराझ खान, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), कोना भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार व आकाशदीप. (Ind vs Eng Test Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.