SL vs Afg ODI Series : निसांकाच्या १३६ चेंडूंत २०० धावा, जयसूर्याचा विक्रम मोडला

सनथ जयसूर्याने २४ वर्षांपूर्वी भारताविरुद्ध १८९ धावा केल्या होत्या. 

238
SL vs Afg ODI Series : निसांकाच्या १३६ चेंडूंत २०० धावा, जयसूर्याचा विक्रम मोडला
  • ऋजुता लुकतुके

पथुम निसांका (Pathum Nissanka) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकन फलंदाज बनला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात निसांकाने १३६ चेंडूंत २०० धावांची खेळी रचली. आणि लंकन संघाला ३८१ असा मोठा धावांचा डोंगर रचण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर सनथ जयसूर्याचा (Sanath Jayasuriya) सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही त्याने यावेळी मोडला. जयसूर्याने २००० साली भारताविरुद्ध १८९ धावा केल्या होत्या. (SL vs Afg ODI Series)

पल्लीकल इथं झालेल्या सामन्यात निसांका (Pathum Nissanka) २१० धावांवर नाबाद राहिला. यात त्याने २० चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी केली. (SL vs Afg ODI Series)

निसांकाच्या (Pathum Nissanka) या कामगिरीमुळे श्रीलंकन संघाने अफगाणिस्तान विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना ४२ धावांनी जिंकला. पण, फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर अफगाणिस्ताननेही चांगली लढत दिली. श्रीलंकन संघाने निर्धारित ५० षटकांत ३ बाद ३८१ धावा केल्या. यात निसांकाच्या (Pathum Nissanka) खालोखाल अविष्का फर्नांडो (८८) आणि समरवीरा (४५) यांनी योगदान दिलं. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीने १० षटकांत ४४ धावा देत एक बळी टिपला. बाकी सगळ्यांच्या गोलंदाजीवर लंकन फलंदाजांनी धावांची लयलूट केली. (SL vs Afg ODI Series)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, देवेंद्र फडणवीसांनी लगावला खोचक टोला)

विजयासाठी ३८२ धावांचं आव्हान असताना अफगाण फलंदाजांनीही खराब सुरुवातीनंतर निकराचा प्रयत्न केला. गुरबाझ, झदरान, हशमतुल्ला आणि रहमत हे चार आघाडीचे फलंदाज २७ धावांतच बाद झाले असताना आणि निम्मा संघ ५५ धावांत तंबूत परतला असताना अझमतुल्ला ओमारझाई (१४९ नाबाद) आणि मोहम्मद नाबी (१३६) यांनी अफगाण किल्ला लढवला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी २५२ धावांची भागिदारी केली. आणि अफगाण संघाला काही काळासाठी विजयाची आशाही दाखवली. (SL vs Afg ODI Series)

पण, धावगती अफगाण संघाच्या अवाक्याबाहेरचीच होती. आणि त्यातच नाबीही बाद झाला. आणि अफगाण आव्हान तिथेच संपलं. पथुम निसांकालाच (Pathum Nissanka) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. ३ सामन्यांच्या या मालिकेत आता श्रीलंकेनं १-० अशी आघाडी घेतली आहे. (SL vs Afg ODI Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.