Virat Kohli : रवी शास्त्रींना विराट कोहलीचा कुठला गुण आवडतो?

विराट कोहलीची वैयक्तिक कामगिरी आणि संघातील विजयी योगदान करणारा खेळाडू अशा प्रगतीचे रवी शास्त्री साक्षीदार आहेत. 

246
Virat Kohli : रवी शास्त्रींना विराट कोहलीचा कुठला गुण आवडतो?
Virat Kohli : रवी शास्त्रींना विराट कोहलीचा कुठला गुण आवडतो?
  • ऋजुता लुकतुके

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी अलीकडेच एका मुलाखतीत विराट कोहलीबरोबरचा (Virat Kohli) आपला काळ आणि वैयक्तिक कामगिरी ते संघाच्या विजयात योगदान असा त्याचा प्रवास याविषयी भाष्य केलं आहे. ‘विराट (Virat Kohli) हा पैलू पडलेला हिरा,’ असल्याचं विधान रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. विराटकडे सगळ्यांना प्रेरणा देण्याचा नेतृत्व गुण आहे, असंही रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी माजी इंग्लिश कर्णधार मायकेल आथर्टनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. (Virat Kohli)

कोहली (Virat Kohli) आपल्याला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो पैलू न पाडलेला हिरा आहे असंच आपल्याला वाटलं होतं. आणि नवीन आव्हानं स्वीकारण्याचा त्याचा स्वभाव आपल्याला भावला होता, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी बोलून दाखवलं. ‘नेट्समध्ये आम्ही खेळाडूंना खूप मोकळीक देऊ केली होती. ते विराटचे सुरुवातीचे दिवस होते. तुम्ही पाहिजे ते नेट्समध्ये करा. आणि इतर खेळाडूंसमोर आव्हान उभं करा असं आव्हान मी खेळाडूंना दिलं होतं. विराट (Virat Kohli) तेव्हा नेट्समध्ये सगळं करायचा. त्याला कपडे मळतील, दुखापत होईल अशी कसलीच काळजी नसायची. त्याला फक्त संधी दिसायची. आणि तो आव्हानांसाठी तयार असायचा,’ असं रवी शास्त्री (Ravi Shastri) विराटच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना म्हणाले. (Virat Kohli)

(हेही वाचा – Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून मनी लॉंड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल)

आपल्या खेळात सतत बदल करण्याची तयारी आणि त्यासाठी मेहनत घेण्याची सवय यामुळे विराट कोहली (Virat Kohli) आजही खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना वाटतं. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचं महत्त्व अधोरेखित करतानाच शास्त्री यांनी क्रिकेटचा नवीन खंडांमध्ये प्रसार करायचा असेल तर टी-२० क्रिकेट आणि त्यातही फुटबॉलच्या धर्तीवर फ्रँचाईजी क्रिकेटही पुढील वाटचाल असू शकते असं शास्री यांचं मत आहे. (Virat Kohli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.