Rohit Sharma : रोहित शर्माकडून घ्या नेतृत्वाच्या टीप्स

रोहित शर्मासाठी संघाचं नेतृत्व म्हणजे काय, ऐकूया त्याच्याच शब्दांत. 

232
Rohit Sharma : बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्माचा फलंदाजीचा जोरदार सराव
Rohit Sharma : बांगलादेश मालिकेपूर्वी रोहित शर्माचा फलंदाजीचा जोरदार सराव
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्माने (Rohit Sharma) नेतृत्व गुण म्हणजे नेमकं काय आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो नेमकं काय करतो, हे एका कार्यक्रमात मुंबईत उलगडून सांगितलं. मैदानावरील धोरणात्मक निर्णय आणि मैदानाबाहेर खेळाडूंबरोबरचा परस्पर संवाद अशी नेतृत्वाची गुंफण त्याने पहिल्यांदा लोकांसमोर आणली. (Rohit Sharma)

‘प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास जागवणं आणि त्यांना संघात महत्त्वाचं स्थान आहे हे त्यांना पटवून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं. खेळाडू ५ चेंडू खेळो किंवा ५०, पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करो किंवा सहाव्या, तो महत्त्वाचा आहे हे त्याला सांगत राहणं म्हणजेच कप्तानी,’ असं सुरुवातीलाच रोहितने (Rohit Sharma) सांगितलं. (Rohit Sharma)

खेळाडूंबरोबर वैयक्तिक संवाद साधणं, त्यांची संघातील भूमिका त्यांना समजावून सांगणं आणि सगळ्यांना समान वागणूक देणं हे कप्तानाचे गुण आहेत असं रोहितला (Rohit Sharma) वाटतं. ‘मी मैदानाबाहेर खेळाडूंबरोबर खूप वेळ घालवतो. त्यांना काळजी वाटत असेल तर ती लगेच समजून घेतो. आणि मग त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतो,’ असं रोहितने (Rohit Sharma) संघातील वातावरणाविषयी बोलताना सांगितलं. (Rohit Sharma)

(हेही वाचा – Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून मनी लॉंड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल)

विजयाचा हाच सिलसिला कायम ठेवायचा आहे – रोहित शर्मा 

सलामीवीर म्हणून त्याच्यावरची जबाबदारी ही तितकीच मोठी आहे, याची रोहितला (Rohit Sharma) कल्पना आहे. कठीण वातावरणातही चांगली सुरुवात करून देण्यासाठी कौशल्य हवं. आणि नेट्समध्ये तशी मेहनत घ्यायला हवी असं रोहितने (Rohit Sharma) सांगितलं. तर सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत नवीन खेळाडूंनी दिलेल्या योगदानाविषयी त्याने समाधान व्यक्त केलं. (Rohit Sharma)

‘पहिल्या कसोटीतील पराभवानंतर खेळाडू निराश होते. पण, त्यांना हारही मान्य नव्हती. त्यामुळेच आम्ही दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकलो. आता हाच विजयाचा सिलसिला कायम ठेवायचा आहे,’ असं रोहित (Rohit Sharma) म्हणाला. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटला होणार आहे. आणि कसोटीसाठी संघाची निवड जाहीर झाली असून संघात विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) असणार नाहीत. त्यामुळे मधल्या फळीत नवीन खेळाडूंना जबाबदारी उचलावी लागणार आहे. (Rohit Sharma)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.