पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) १३ आणि १४ फेब्रुवारीला संयुक्त अरब अमिरात येथे (UAE) दौरा करणार आहेत. अबुधाबी येथील पहिल्या बीएपीएस हिंदू मंदिराचे ते उद्घाटन करणार आहेत. जागतिक शिखर परिषद २०२४ मध्ये ते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून शिखर परिषदेत ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
त्यांच्या दौऱ्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिली. 2015 पासून पंतप्रधान मोदींचा हा संयुक्त अरब अमिरातीचा सातवा आणि गेल्या आठ महिन्यातील तिसरा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेतील.
(हेही वाचा – Raj Thackeray: इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ‘ती’ वीट देण्यासाठी राज ठाकरे पुण्यात )
हे दोन्ही नेते दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीबाबत सखोल, विस्तार आणि बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांचीही भेट घेतील. अबू धाबी येथील झायेद स्पोर्ट्स सिटी येथे संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला ते संबोधित करणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community