तांत्रिक बिघाड आणि साचलेले पाणी वगळता अविरत धावणाऱ्या लोकल विचित्र कारणामुळे खोळंबल्याचे समोर आले आहे. यामुळे शनिवारी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Central Railway)
शुक्रवारी मुरलीधर शर्मा या मोटरमनने कामातील चुकीमुळे आत्महत्या केली होती. रेल्वेचा रेड सिग्नल त्याने तोडला होता. यामध्ये कारवाई होईल, म्हणून त्याने सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान आत्महत्या केल्या दावा सहकाऱ्यांनी केला होता, तर रेल्वेने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन गेले होते. या मोटरमनच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी या मोटरमननी आता सिंगल ड्युटी करणार असून डबल ड्युटी करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
(हेही वाचा – पोषण अभियानंतर्गत काम करणाऱ्या Anganwadi Sevika ना १.१५ लाख मोबाईल )
त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन आणि रल्वे कर्मचारी गेल्यामुळे इतर लोक गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून आतापर्यंत ८४ लोकल रद्द झाल्या आहेत. रात्रीपर्यंत आणखी लोकल रद्द होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच मोटरमन नसल्यामुळे गाड्या उशिराने धावत असून स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे.
सुमारे दीड दोन तासांपासून लोकल सीएसएमटी स्थानकात थांबलेल्या आहेत. प्रवाशांना अचानक या आंदोलानामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हेही पहा –