मुंबईतील कायम रहिवाशी असलेल्या दिव्यांगांना (Handicap) आता महापालिकेच्यावतीने अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली. त्यानंतर आता प्रस्तावालाच प्रशासकांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिल २०२४ पासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील स्थायिक असलेल्या ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तीला वर्षाला १२ हजार रुपये आणि ८० टक्क्यांवरील दिव्यांगाला वर्षाला ३६ हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हे अर्थसहाय्य सहसंवेदना या योजनेअंतर्गत दिले जाणार होते, परंतु त्याचे नाव पुढे धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना असे करण्यात आले आहे. (Handicap Financial Assistance)
दिव्यांग (Handicap) व्यक्तींना अर्थसहाय्य देण्याबाबत वारंवार दिव्यांग व्यक्ती, प्रहार अपंग क्रांती संस्था, बृहन्म महाराष्ट्र अपंग संचलीत टेलीफोन बुथ संघटना, मानव विकास संस्था, आदी दिव्यांग संघटना यांच्याकडून दिव्यांगांना (Handicap) पेन्शन योजना सुरु करावी अशी मागणी होत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियाना अंतर्गत दिव्यांग राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी ३० मे २०२३ व ०१ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्येही दिव्यांगांना (Handicap) अर्थसहाय्य योजना सुरु करण्याबाबत निर्देश दिले. इतर महानगरपालिकांमध्येही दिव्यांगांना अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वीत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांना अर्थसहाय्य योजना सुरु केल्यास त्याचा फायदा दिव्यांगांना (Handicap) मिळेल व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल, अशी सूचना केली होती, त्यानुसार महापालिका प्रशासनाने जेंडर बजेट अंतर्गत ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Handicap Financial Assistance)
महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिव्यांगांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. मुंबईतील ४० टक्के ते ८० टक्के दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग (Handicap) व्यक्तींना दर सहा महिन्याला ६.०००रुपये याप्रमाणे एका वर्षाकरिता एकूण १२,००० रुपये तसेच ८० टक्के वरील दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना दर सहा महिन्याला १८,००० रुपये याप्रमाणे एका ३६,००० याप्रमाणे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती, याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती प्रशासक यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये एकूण १८ वर्षांवरील ५९,११५ दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या अर्थसहाय्याकरता वर्षाला ५५.९१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (Handicap Financial Assistance)
अर्थसहाय्य देण्याची गरज का भासते
दिव्यांग (Handicap) व्यक्तींमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत विशेष गुण असतात. त्यामुळे त्यांना अपंग न समजता ‘दिव्यांग’ संबोधले जाते. दिव्यांगांच्या २१ प्रकारांना केंद्र शासनाने (Central Govt) मान्यता दिली आहे. यामधील ब-याच अशा प्रकारच्या दिव्यांगांना विविध समास्यांना नेहमी सामना करावा लागतो. यामध्ये गतिमंद ह्या व्यक्ती पूर्णपणे परावलंबी असतात. अंध, कुष्ठरोगातून बरे झालेल्या व्यक्ती, बौध्दिक अक्षमता, मानसिक विकलांगता, ऑटिजम, सेरेब्रल पाल्सी, मस्कुलर डिस्टॉफी, थैलेसिमिया ही मोफिलीया, बहुअवयव अकार्यक्षमता असे विविध प्रकारच्या दिव्यांगत्वामध्ये (Handicap) ते अकार्यक्षम असताना कोणतेही काम अथवा आपले शिक्षण पूर्ण करु शकत नाहीत, त्यांना नेहमी वैद्यकीय उपचार व पौष्टिक आहाराची गरज असते. यासाठी ते पूर्णतः आपल्या कुटुंबावर अवलंबून असतात, जर कुटुंब या आर्थिक बाबी पूर्ण करु न शकल्यास त्या दिव्यांगाची गैरसोय होते. त्यातच दिव्यांगांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन हा फार त्रासदायक आणि भयानक असतो, त्यांचे कुटुंब कुठेतरी, केव्हातरी पेन्शन स्वरुपात आर्थिक आधार मिळेल याची वाट बघत असतात व महानगरपालिकेकडून मदत होईल. (Handicap Financial Assistance)
(हेही वाचा – Chhagan Bhujbal : धमक्या आल्या म्हणून चळवळीपासून अलिप्त होणार नाही)
दिव्यांगांच्या तीव्रतेवर अशाप्रकारे दिले जाते युडीआडी कार्ड
सफेद कार्ड : दिव्यांगत्व हे ४० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर
पिवळे कार्ड : दिव्यांगत्व हे ४० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर
निळे कार्ड : दिव्यांगत्व हे ८० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर (Handicap Financial Assistance)
कोणत्या दिव्यांगांना कसे मिळणार अर्थसहाय्य
कार्डचा प्रकार : पिवळे कार्डधारक
- दिव्यांगाची टक्केवारी : ४० ते ८० टक्के
- दिव्यांगाची युडीआयडी कार्डधारकांची संख्या : ४२,०७८
- अर्थसहाय्य : प्रत्येक सहा महिन्यांनी ६,००० रुपये, वर्षाला १२ हजार रुपये याप्रमाणे (Handicap Financial Assistance)
कार्डचा प्रकार : निळे कार्डधारक
- दिव्यांगाची टक्केवारी : ८० टक्क्यांवरील
- दिव्यांगाची युडीआयडी कार्डधारकांची संख्या : १७,०३७
- अर्थसहाय्य : प्रत्येक सहा महिन्यांनी १२,००० रुपये, वर्षाला ३६ हजार रुपये याप्रमाणे (Handicap Financial Assistance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community