आपल्याला माहितंच आहे, की सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज आरक्षणाची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सध्या राज्यातील मराठा समाज फार नाराज झाला आहे. त्यातच विरोधकांनीही मराठा आरक्षण रद्द होणं हे राज्य सरकारचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. पण ‘मी जबाबदार’ असं म्हणणारं राज्य सरकार आता मात्र, आपल्या अपयशाची जबाबदारी स्विकारतंच नाही. आता हा तिढा केंद्र सरकारने सोडवावा, असं राज्य सरकारचे मंत्री म्हणत आहेत. आजवर लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांसारख्या अनेक मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारने केंद्र सरकारकडेच बोट दाखवले आहे. आता मराठा आरक्षणासाठीही केंद्राने प्रयत्न करावेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यावर ते विरोधकांच्या टीकेच्याही केंद्रस्थानी आले आहेत. बघा विरोधकांची बोचरी टीव-टीव…
Join Our WhatsApp Community