- ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेच्या सोव्हरिन गोल्ड बाँडाचे नवीन रोखे सोमवारपासून विक्रीसाठी खुले होत आहेत. पुढील पाच दिवस त्यांची विक्री सुरू राहणार असून त्यांची किंमत ६,२४३ रुपये प्रती ग्रॅम इतकी निश्चित करण्यात आली आहे. सोव्हरिन गोल्ड बाँड स्कीम २०२३-२४ ची ही चौथी सीरिज आहे.
या बाँडसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि पैसेही डिजिटल माध्यमातून करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सरकारने यंदा प्रती युनिट ५० रुपयांची सवलत देऊ केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बाँबे स्टॉक एक्सचेंज, टपाल कार्यालयं, महत्त्वाच्या बँका (स्मॉल फायनान्स बँका, ग्रामीण बँका, पेमेंट बँका वगळून) इथं हे बाँड विक्रीसाठी उपलब्ध असतील.
Sovereign Gold Bond Scheme 2023-24 (Series IV) will open for subscription from 12th-16th February, 2024
Read here: https://t.co/VUEy9AbLlm@FinMinIndia
— PIB India (@PIB_India) February 10, 2024
(हेही वाचा – Central Railway : मोटरमनने प्रगती एक्स्प्रेससमोर जीव दिला, १००पेक्षा जास्त लोकल रद्द)
बाँडची मुदत आहे इतक्या वर्षांची
या बाँडमध्ये मिळणारं सोनं हे ९९९ शुद्धतेचं असेल. आणि गुंतवणूकदारांना अडीच टक्के दराने वर्षातून दोनदा व्याज मिळले. वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदार कमाल ४ किलो सोनं या बाँडमध्ये घेऊ शकतील. तर सेवाभावी संस्था आणि इतर संस्थांना २० किलो सोनं खरेदी करायला परवानगी आहे. या बाँडची मुदत ८ वर्षांची आहे. आणि ५ वर्षं पूर्ण झाल्यानंतर व्याज लागू होतं त्या दिवसापासून तुम्ही मुदतपूर्व निर्गुतवणुकीसाठी पात्र ठरु शकता.
कर्जाचं तारण म्हणून हे बाँड वापरता येऊ शकतात. आणि प्रत्यक्ष सोनं खरेदी करताना जी केवायसी प्रक्रिया करावी लागते तिच या बाँडच्या खरेदीसाठीही करावी लागते. लोकांची सोनं खरेदी कमी व्हावी आणि सोन्यात अडकून पडलेला पैसा गुंतवणुकीसाठी बाहेर यावा या उद्देशाने ऑक्टोबर २०१५ मध्ये सरकारने पहिल्यांदा गोल्ड सोव्हरिन बाँड काढले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community