Vanchit Bahujan Aghadi चा महाविकास आघाडीत मसुदा सुरुंग

महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश एकत्रित जाहीरनाम्यात व्हावा, अशी अपेक्षा आहे, असे वंचितच्या नेत्याने स्पष्ट केले.

346
Vanchit Bahujan Aghadi २०१९ चा कित्ता पुन्हा गिरवणार?

महाविकास आघाडीत तांत्रिकदृष्ट्या सहभागी झालेल्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) एक लहानसा ‘मसुदा सुरुंग’ लावला असून लवकरच पुढील काही दिवस त्याचे फटाके फुटून त्याची झळ कॉँग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गट (NCP Sharadchandra Pawar group) आणि शिवसेना ऊबाठा (Shiv Sena UBT) गटाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : धमक्या आल्या म्हणून चळवळीपासून अलिप्त होणार नाही)

मसुदयावर निर्णय होत नाही तोवर जागांवाटपावर चर्चा नाही –

एकूण ३९ मुद्दे असलेला मसुदा ‘वंचित’ने कॉँग्रेससह अन्य दोन्ही गटांना ७ फेब्रुवारीला दिला असून त्यावर अद्याप कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मसुदा प्रसिद्ध करताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीला आणखी एक अट घातली की जोवर या मसुदयावर अंतिम निर्णय होत नाही तोवर जागांवाटपावर चर्चा सुरू होणार नाही. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्याकडून सरवणकर, शिरसाट यांची विचारपूस)

लोकसंख्या कमी निधी कमी –

या मसुदयातील ३९ पैकी काही मुद्दे वादग्रस्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘अनुसूचित जाती-जमातींच्या (Scheduled caste and tribes) विकासाकरिता त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी आवंटीत करण्यात कायदा करण्यात येईल.’ असा एक मुद्दा असून याचा अर्थ आदिवासी (tribals) आणि दलित (dalit) यांची लोकसंख्या ज्या भागात कमी असेल तिथे या अनुसूचित जाती-जमातींच्या विकासाकरिता (Development fund) कमी निधी उपलब्ध करून दिला जाईल. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – President Droupadi Murmu : यांनी केले आदिवासी समुदायाच्या जीवनचक्राचे कौतुक)

शेतकऱ्यांना/मजुरांना मासिक ५,००० आणि ७,००० रुपये –

‘महाराष्ट्रात दोन लाख ४४ हजार ४०५ शासकीय नोकऱ्या (government jobs) तसेच केंद्रीय अस्थापणातील ३० लाखापेक्षा जास्त रिक्त पदे (vacant posts) एक वर्षात युद्धपातळीवर भरली जातील. ४ हेक्टर (१० एकर) पेक्षा कमी जमीन मालकीच्या शेतकरी कुटुंबांना विशेष सहकार्य करण्याचे धोरण निश्चित केले जावे असा एक मुद्दा आहे. म्हणजे १० एकरपर्यंत जमीन असणाऱ्या मालकांना विशेष सहकार्य मिळणार. शेतकरी/मजूर पेन्शन योजना अंतर्गत ६० वर्ष वय पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना/मजुरांना मासिक ५,००० आणि ७,००० रुपये शेतकरी पेन्शन योजना (farmers pension scheme) लागू करण्यात येईल’. मासिक ५,०००-७००० पेन्शन घोषणा अव्यवहार्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. असे काही मुद्दे या मसुदयात असून यावर एकमत होणे कठीण असल्याचे मत एका शिवसेना ऊबाठा नेत्याने व्यक्त केले. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – Central Railway : मोटरमनने प्रगती एक्स्प्रेससमोर जीव दिला, १००पेक्षा जास्त लोकल रद्द)

महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश एकत्रित जाहीरनाम्यात व्हावा, अशी अपेक्षा आहे, असे वंचितच्या नेत्याने स्पष्ट केले.(Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.