राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका करत शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत राज्यपालांना नाही तर सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की त्यांनी राज्यातील सरकार बरखास्त करून न्याय द्यावा. “सर्वोच्च न्यायालयाने ही पत्रकार परिषद पाहून आम्हाला न्याय देईल आणि या देशातील लोकशाही वाचवेल,” अशी अपेक्षा ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – Mumbai Deep Cleaning : मुंबईचा परिसर अस्वच्छ आणि निघाले लहानसहान गल्लीबोळ स्वच्छ करायला )
राष्ट्रपतीचे प्रतिनिधि म्हणून राज्यपाल
ठाकरे (Uddhav Thackeray) हे माजी मुख्यमंत्री असून सरकार बरखास्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करून उपयोग नसतो तर राज्याचे प्रमुख आणि राष्ट्रपतीचे प्रतिनिधि म्हणून राज्यपाल हे राज्यात असतात, त्यांच्याकडे मागणी करावी लागते. (Uddhav Thackeray)
हात जोडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती
ठाकरे यांनी पोलिसांच्या कामात सरकारने हस्तक्षेप न करता, त्यांना त्यांचे काम करू द्यावे, त्यांच्या मागे उभे राहावे असा सल्ला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. “आम्ही राज्यपालांकडे जात नाही, कारण आम्हाला त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. मुळात राज्यपाल पद हे असावे की नाही हाच प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही तुमच्या (सर्वोच्च न्यायालय) माध्यमातून या सरकारच्या बरखास्तीची मागणी करत आहोत. आम्ही हात जोडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो. तुम्हीच शेवटचे आशेचे किरण आहात, ही पत्रकार परिषद पहावी आणि आम्हाला न्याय द्यावा,” असे ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. (Uddhav Thackeray)
न्यायालय झापालय होता कामा नये
तसेच सर्वोच्च न्यायालयालाही ठाकरे यांनी सुनावले. “सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे मारेले, झापले पण शहण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो. एक वर्ष होऊन हे घटनाबाह्य सरकार इथे आहे. न्यायालय हे न्यायालय राहिले पाहिजे त्याचे झापालय होता कामा नये. जनतेला, लोकशाहीला वाचवा,” अशी मागणी केली. (Uddhav Thackeray)q
हेही पहा –
Join Our WhatsApp Community