काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांच्याविरोधात कारवाईची माहिती देणारे पत्र जारी केले आहे. पक्षाविरुद्ध शिस्तभंगाच्या आणि वारंवार वक्तव्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रमोद कृष्णम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे, असे या पत्रात म्हटले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस समितीने प्रमोद कृष्णम यांच्या संदर्भात पक्षाध्यक्षांकडे प्रस्ताव पाठवला होता, ज्याला मंजुरी देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Firing : मुंबईनंतर आता पुणे हादरले; घोसाळकरांच्या हत्येनंतर पुण्यात दुकानदारावर गोळ्या झाडून स्वतःला संपवले)
विशेष म्हणजे नुकताच कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती.
(हेही वाचा – Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा पूर्वपदावर)
कृष्णम काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली –
प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांनी २०१९ ची निवडणूक लखनौ येथून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी अलीकडेच अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते आणि कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल काँग्रेसवर टीका देखील केली होती. कृष्णमने या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील संभळ येथे श्री कल्की धामच्या पायाभरणी सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. (Acharya Pramod Krishnam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community