कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचताना चांगला संदेश द्यायचा आहे. त्यादृष्टीने आपापल्या मतदारसंघात काम होणे गरजेचे आहे. पक्षाच्या वाढीसाठी सकारात्मकपणे काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी केले.
(हेही वाचा – Acharya Pramod Krishnam : शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया, कॉंग्रेस कडून आचार्य प्रमोद कृष्णम यांची हकालपट्टी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा, महिलांना बस प्रवासात ५०% सवलत, मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय यांसारख्या योजना महिलांसाठी सरकारकडून राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी (Dr. Neelam Gorhe) सांगितले.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : शासन आपल्या दारीच्या माध्यमातून २.६० कोटी नागरिकांना विविध योजनाचा लाभ)
मलबार हिल येथील नंदनवन येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवदुर्गा महिला परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित महिलांना त्या (Dr. Neelam Gorhe) मार्गदर्शन करत होत्या.
(हेही वाचा – Muslim : मुसलमानांचा देश मलेशियातच १६ शरिया कायदे झाले रद्द)
याप्रसंगी आमदार यामिनी जाधव, शिवसेना उपनेत्या संध्या वाढावकर यांसह दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भायखळा, शिवडी, मलबार हिल, वरळी, मुंबादेवी आणि कुलाबा या सहा विधानसभा मतदारसंघातील महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन शिवसेना उपनेत्या आशाताई मामीडी व सुशीबेन शाह यांनी केले. (Dr. Neelam Gorhe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community