Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाला पाठिंबा; काय म्हणाले छगन भुजबळ?

361
गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचे वादळ उठलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आहे. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात नवा कायदा येणार आहे. या कायद्याला खंबीर पाठिंबा आहे. अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी मांडली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात ते बोलत होते.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत 

कोण म्हणते पक्ष चोरला, कुणी आणखी काही म्हणते, मात्र एक लक्षात ठेवा ही लोकशाही आहे. ज्या बाजूने बहुमत आहे, त्यांच्या बाजूने निर्णय लागतो. त्यामुळे अजित पवार यां पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळाले आहे, असेही भुजबळ म्हणाले. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचे आपले स्वप्न आहे. यासाठी अल्पसंख्याक यांना सोबत घेऊन जावे लागेल. अजित पवारांच्या नेतृत्वात आपल्याला एक नंबर राहायचे आहे, असे भुजबळ  (chhagan bhujbal) म्हणाले.

खेकड्याची वृत्ती सोडा 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. यात जीव तोडून काम करावे लागेल. आपल्या कामाचा हिशोब केला जाईल. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचा विचार केला जाईल. एकमेकांचे पाय खेचणे बंद करा. खेकड्याच्या वृत्तीने काम करू नका. संकटं खूप येणार, अडचणी येणार, पण काळजी करू नका, असा सल्ला भुजबळांनी  (chhagan bhujbal) पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.