देशात इलेक्ट्रिक इंजिनांऐवजी आता हायड्रोजनवर चालणारी इंजिने विकसित करण्याचे काम सुरू आहे. सध्या देशातील रेल्वेगाड्या इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनावर धावत आहेत. (hydrogen train) भविष्यात मात्र बदल दिसू शकतात. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी लोकसभेत ही माहिती दिली. संसदेत याविषयी विचारलेल्या प्रश्नाला वैष्णव उत्तर देत होते.
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi : आम्हाला बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवले; रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर सवाल)
ट्रेनचे उत्पादन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत
आम्ही लवकरच हायड्रोजन इंधन सेलचा वापर करून रेल्वेगाडी चालवण्यात यशस्वी होऊ. आम्ही या अभिनव प्रकल्पाबाबत उत्सुक आहोत. सध्या हा पायलट प्रोजेक्ट म्हणून हाती घेतला जात आहे. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाने (Hydrogen Fuel Cell Technology) बनवलेल्या ट्रेनचे उत्पादन इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईत केले जाईल.
रेल्वे गाड्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज
2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन (Zero carbon emissions) साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वे नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. रेल्वे पूल आणि स्टार रेटिंग करण्यासोबतच, रेल्वे गाड्यांना अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचे काम करत आहे, जेणेकरून गाड्या वेळेवर धावू शकतील, ज्यामुळे इंधनाची बचत होईल.
हायड्रोजनवर चालणाऱ्या या रेल्वे प्रकल्पामुळे वाहतुकीच्या मोठ्या समस्येचे निराकरण होऊ शकते. हा प्रकल्प सरकारच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध आहे, हे या प्रकल्पातून दिसून येते. (Ashwini Vaishnaw)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community