U19 World Cup 2024 : अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

247
U19 World Cup 2024 : अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव
U19 World Cup 2024 : अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

19 वर्षांखालील वन डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत 50 षटकांत 7 बाद 253 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना भारताने (India) 41 षटकांत 9 गडी गमावून 169 धावा केल्या. मुरुगन अभिषेक 42 धावा करून बाद झाला. त्याला कॅलम विडलरने कर्णधार ह्यू वायबगेनच्या हाती झेलबाद केले. (U19 World Cup 2024)

(हेही वाचा – CAPF Recruitment : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांत परीक्षा)

असे गेले बळी

राज लिंबानी (Raj Limbani) शून्यावर बाद झाला. त्याला राफ मॅकमिलनने बोल्ड केले. राफ मॅकमिलननेच अरावेली अवनिश (0 धावा) आणि सचिन धस (9 धावा) यांचे बळी घेतले. महली बियर्डमनने आदर्श सिंग (47 धावा), कर्णधार उदय सहारन (8 धावा) आणि मुशीर खान (22 धावा) यांचे बळी घेतले.

25व्या षटकात प्रियांशु मोलिया (Priyanshu Molia) (9 धावा) याला चार्ली अँडरसनने परत पाठवले. अर्शीन कुलकर्णी (12 धावा) कॅलम विडलरकडून झेलबाद झाला.

2020 पासून भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत जिंकला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर हा मोठा धक्का आहे. (U19 World Cup 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.