महर्षी दयानंद सरस्वती (Maharishi Dayanand Saraswati) यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८२४ साली गुजरातमधील सौराष्ट्रातील मोरबी नावाच्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अंबाशंकर तिवारी असे होते. ते औदिच्य ब्राह्मण होते. महर्षी दयानंद सरस्वती (Maharishi Dayanand Saraswati) हे भारतीय समाजसुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. आर्य समाजाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला आहे. सुरुवातीला ते अहमदाबाद येथे गेले. त्यानंतर त्यांनी बडोदा, पुणे, मुंबई याठिकाणीही आर्य समाजाचा प्रचार केला.
“भारतीयांसाठी भारत” संकल्पना
आर्य समाज ही संस्था म्हणजे हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ आहे. त्यांचा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ वेदांच्या तत्त्वज्ञानावर आणि मानवाच्या विविध कल्पना आणि कर्तव्यांचे स्पष्टीकरण देणारा एक प्रभावशाली ग्रंथ आहे. आजही या ग्रंथाचे वाचन केले जाते. १८७६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा स्वराज्याची हाक दिली होती. “भारतीयांसाठी भारत” ही त्यांची संकल्पना होती. पुढे लोकमान्य टिळकांनी देखील स्वराज्याची हाक दिली.
वैदिक विचारसरणीचे पुनरुज्जीवन
लहानपणापासून त्यांच्यात विद्वत्ता होती. दयानंद सरस्वती (Maharishi Dayanand Saraswati) यांनी वैदिक विचारसरणीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले. त्यांनी दयानंदांनी कर्म आणि पुनर्जन्म या सिद्धांताचा पुरस्कार केला. त्यांनी ब्रह्मचर्याच्या वैदिक आदर्शांवर भर दिला, ज्यात ब्रह्मचर्य आणि देवाची भक्ती समाविष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्यता निवारण, स्त्रियांना समान अधिकार अशी कामे केली आहेत. तसेच त्यांनी वेदांवर हिंदीतून भाष्य केले आहे. भारताचे राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांनी “आधुनिक भारताचे निर्माते” असे म्हणत दयानंद सरस्वती यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
Join Our WhatsApp Community