हा महिना प्रेमाचा आहे, प्रेम व्यक्त करायला मर्यादा अजिबात नसते, भावना नुसत्या नजतेतूनही व्यक्त होतात आणि शब्दातूनही. शब्दातून व्यक्त करण्यासाठी त्यामागे भावना निश्चितच प्रेमाची उंची वाढवतात. मराठी भाषेत (Love Quotes in Marathi) अनेक साहित्यिक आहेत, जसे मंगेश पाडगावकर, वपु काळे, कुसुमाग्रज, इंदिरा संत आणि नव्या पिढीतील संदीप खरे, गुरु ठाकूर, वैभव जोशी अशा साहित्यिकांचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. मराठी भाषा अशी आहे, ज्यामुळे प्रेम व्यक्त करताना (Love Quotes in Marathi) त्यातून भावनांचे अनेक तरंग मनामध्ये उमटतात. १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम व्यक्त करणारा आहे. त्यासाठी मराठी भाषेत शब्द भंडार कमी नाही.
काही आहेत मराठीतील हृदयस्पर्शी संवाद?
- नात ते टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो..
- प्रेमाचे वर्णन करू तरी कसे जणू सप्तसुरांतील सूर भासे व्यक्त न करण्याजोगे सख्या तुझे अन माझे हे प्रेम असे
- कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका.. कारण माणसे तेवढेच समजतात जेवढी त्यांची कुवत असते..
- काळजी आहे अस दाखवणे आणि खरोखरच काळजी असणे यात देखील खूप मोठा फरक असतो..
- तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे तिला मी गमवायला खूप घाबरतो.
- प्रेम ज्याला मिळत त्याला कळत नाही, ज्याला कळत त्याला मिळत नाही..!
- लाख सुंदर लोक आहेत या जगात, पण जी व्यक्ती अलगत आपल्या मनात बसते तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसते..!!
- कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की नेहमी तुलाच पाहत राहवस वाटत
- गोड अबोल हा तुझा रुसवा जणू वेड लावे माझ्या जीवा, क्षणात हसरा क्षणाचा रागवा प्रेमाने भरलेला अल्लड गोडवा
- माझ्यावर उत्कट प्रेम तुझ्या हृदयात भरले होते, कित्येक वेळा त्याची छबी तुझ्या डोळ्यात मी पहिली होती
- मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतले आणि म्हणाली यापेक्षा मोठ नक्कीच नसेल
- आपल्या जवळच्या माणसांसाठी नेहमी वेळ काढा, नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील
- आयुष्यात एकवेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते
- बोलणे फिस्कटले की मोडतो तो व्यवहार प्रेम नव्हे