PM Narendra Modi : महर्षी दयानंद हे वैदिक ऋषीच नव्हे, तर राष्ट्रीय ऋषीही आहेत

स्वामी दयानंद यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता आणि हरियाणा हे त्यांचे कार्यक्षेत्र होते, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी या दोन्ही प्रदेशांशी त्यांचे संबंध अधोरेखित केले आणि स्वामी दयानंद यांचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव असल्याचे सांगितले.

177
PM Narendra Modi : महर्षी दयानंद हे वैदिक ऋषीच नव्हे, तर राष्ट्रीय ऋषीही आहेत

स्वामी दयानंद हे आधुनिकतेचे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक होते. त्यामुळेच स्वामीजी केवळ वैदिक ऋषी नव्हते तर ते राष्ट्रीय ऋषीही होते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त गुजरात राज्यातील मोरबीमधील टंकारा येथील स्वामी दयानंद यांच्या जन्मस्थानी आयोजित विशेष कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी दम देताच राऊतांनी गुंडांसोबतचे फोटो टाकणे केले बंद; काय म्हणालेले मुख्यमंत्री?)

स्वामीजींच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्य समाजाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला. अशा महान आत्म्याचे इतके थोर योगदान असताना, त्यांच्याशी संबंधित उत्सव व्यापक असणे स्वाभाविक आहे, असे मत पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) गेल्या वर्षीच्या महोत्सवाच्या उद्घाटनातील त्यांच्या सहभागावर बोलताना व्यक्त केले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

हा कार्यक्रम आपल्या नवीन पिढीला महर्षी दयानंदांच्या जीवनाची ओळख करून देण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून काम करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला. स्वामीजी सारख्या उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांचा वारसा पुढे नेण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी जोर दिला.

(हेही वाचा – Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचे ४५ ड्रोन हल्ले; युक्रेनच्या युद्ध मंत्रिमंडळात फेरबदल सुरू)

स्वामीजींच्या शिकवणीने माझ्या विचारांना आकार दिला – पंतप्रधान

स्वामी दयानंद यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता आणि हरियाणा हे त्यांचे कार्यक्षेत्र होते, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी या दोन्ही प्रदेशांशी त्यांचे संबंध अधोरेखित केले आणि स्वामी दयानंद यांचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव असल्याचे सांगितले. स्वामीजींच्या शिकवणीने माझ्या विचारांना आकार दिला आहे आणि त्यांचा वारसा माझ्या जीवन प्रवासाचा अविभाज्य भाग आहे, असे पंतप्रधान म्हणाले. स्वामीजींच्या जयंतीनिमित्त भारत आणि विदेशातील लाखो अनुयायांना पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) शुभेच्छा दिल्या.

(हेही वाचा – Indian Air Force Academy : भारतीय वायुसेना अकादमीतील 5 महिला अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा)

स्वामीजींच्या कार्यामुळे समाजात आत्मविश्वास पुन्हा निर्माण झाला – पंतप्रधान

स्वामी दयानंदांच्या शिकवणीच्या परिवर्तनात्मक प्रभावावर चिंतन करताना पंतप्रधान म्हणाले की, इतिहासात असे काही क्षण असतात ज्यामुळे भविष्याचा मार्ग बदलतो. दोनशे वर्षांपूर्वी, स्वामी दयानंद यांचा जन्म हा देखील असाच एक अभूतपूर्व क्षण होता. अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या बंधनातून भारताला जागृत करण्यात महत्वपूर्ण योगदान आणि वैदिक ज्ञानाचे सार पुन्हा एकदा जाणून घेण्याच्या चळवळीचे नेतृत्व या स्वामीजींच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “ज्या काळात आपल्या परंपरा आणि अध्यात्म लोप पावत होते, त्या काळात स्वामी दयानंद यांनी आपल्याला ‘वेदांकडे परत’ जाण्याचे आवाहन केले,” असे ते म्हणाले. वेदांवर विद्वत्तापूर्ण भाष्य करणे आणि तर्कशुद्ध व्याख्या प्रदान करण्याच्या स्वामीजींच्या प्रयत्नांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. सामाजिक नियमांवरील स्वामीजींच्या निर्भय आलोचनेवर आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या खऱ्या साराच्या स्पष्टीकरणावर पंतप्रधानांनी भर दिला. स्वामीजींच्या या कार्यामुळे समाजात आत्मविश्वास पुन्हा निर्माण झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्वामी दयानंद यांची शिकवण एकात्मता वाढवण्यासाठी आणि भारताच्या प्राचीन वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण करण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहे याचा पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) पुनरुच्चार केला.

(हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण नॉट रिचेबल; भाजपमध्ये प्रवेश करणार?)

आर्य समाज हा आधुनिकतेचा आणि मार्गदर्शनाचा झळाळता पुरावा –

जगभरातील आर्य समाज संस्थांच्या विस्तृत जाळ्याची प्रशंसा करत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, २,५०० हून अधिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे आणि ४०० हून अधिक गुरुकुलात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत असून, आर्य समाज हा आधुनिकतेचा आणि मार्गदर्शनाचा झळाळता पुरावा आहे. २१व्या शतकात राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांची जबाबदारी नव्या सामर्थ्याने घेण्याचे आवाहन त्यांनी समुदायाला केले. डीएव्ही संस्थांना ‘स्वामीजींची जिवंत स्मृती’ असे संबोधत पंतप्रधानांनी त्यांच्या सतत सक्षमीकरणाची ग्वाही दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.