काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे सोमवारी, १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील, त्यानंतर ते विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा देतील, अशी चर्चा सुरु होती. त्यावर दुपारी शिक्कामोर्तब झाला, जेव्हा चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा त्यांनी सविस्तर न बोलता, आगे आगे देखो होता है क्या’.
महाविकास आघाडीतील पक्षांमधील अनेक मोठे नेते नाराज
सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयातील मुंबई काँग्रेसमधील काही नेत्यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीतील पक्षांमधील अनेक मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यांची त्यांच्या पक्षात घुसमट होत आहे. त्यांना देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी मुख्य धारेत येण्याची इच्छा आहे. त्यामुळे ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांना भाजपमध्ये उचित संधी दिली जाणार आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाबद्दल मी एवढेच बोलू इच्छितो, ‘आगे आगे देखो, होता है क्या?’
Join Our WhatsApp Community