- ऋजुता लुकतुके
टेनिसमधील भारताला सध्याचा आघाडीचा खेळाडू सुमित नागलने (Sumit Nagal) कारकीर्दीतील पाचवं चॅलेंजर विजेतेपद चेन्नईत पटकावलं आहे. आणि त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरातही तो पोहोचला आहे. अंतिम फेरीत त्याने इटलीच्या ल्युका नार्डीचा ६-१ आणि ६-४ ने पराभव केला. सोमवारी जेव्हा जागतिक क्रमवारीची नवी यादी प्रसिद्ध होईल तेव्हा नागल ९८ व्या स्थानावर असेल. (Sumit Nagal in Top 100)
What an emotional day! Stoked to have cracked the Top 100 Ranking. Feels surreal to achieve it in my home country 🇮🇳 Extremely proud of my team for working hard everyday and giving ourselves a chance to be where we are today
(1/n) pic.twitter.com/v3grCQ76SE
— Sumit Nagal (@nagalsumit) February 11, 2024
(हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावर फडणवीसांची बोलकी प्रतिक्रिया… आगे आगे देखो होता है क्या…)
सुमित नागलसाठी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये हे एक प्रकारचं पुनरागमन
२०१९ मध्ये प्रजेश गुणेश्वरन हा शेवटचा भारतीय टेनिसपटू पहिल्या शंभरात पोहोचला होता. नागलने २०२४ च्या हंगामाची सुरुवातच झोकात केली आहे. सुरुवातीला त्याने पात्रता स्पर्धा खेळून ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळवलं. आणि तिथेही त्याने पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. त्यासाठी त्याने पहिल्या ३० मध्ये असलेला खेळाडू बिबलिकला हरवलं. तर आता चेन्नई ओपनमध्येही नागलने (Sumit Nagal) एकही सेट न गमावता हे विजेतेपद पटकावलं आहे. (Sumit Nagal in Top 100)
‘तुमच्या मायदेशात, घरच्या प्रेक्षकांसमोर सामना जिंकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यातच पहिल्या शंभरात पोहोचण्याचं स्वप्न असं मायदेशात पूर्ण झालं आहे. त्यामुळे मी भारावून गेलो आहे. सध्या मी खूप खुश आहे,’ असं नागलने (Sumit Nagal) सामन्यानंतर बोलून दाखवलं. २६ वर्षीय सुमित नागलसाठी (Sumit Nagal) आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये हे एक प्रकारचं पुनरागमन आहे. गेल्यावर्षी दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर फेकला गेला होता. त्यानंतर त्याची क्रमवारी चक्क ५०० पर्यंत घसरली. आणि दुखापतीतून बाहेर आल्यावर स्पर्धा खेळण्यासाठी त्याच्याकडे प्रायोजक नव्हते. त्याच नागलने (Sumit Nagal) या हंगामात पहिल्या दोन महिन्यांतच अख्खं वर्षभर तो खेळू शकेल इतके पैसे बक्षिसाच्या रकमेतूनच मिळवले आहेत. (Sumit Nagal in Top 100)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community