खायला गोड, खमंग, लुसलुशीत लागत असलेल्या पुरणपोळ्या (Puran Poli) बनवणं मात्र थोडं कठीण आणि खर्चिक काम आहे. पुरणपोळी बनवताना डाळ नीट शिजेल ना, पीठ मऊ होईल की नाही, पोळी गोड होईल ना…असे एक ना हजार प्रश्न गृहिणींना पडतात. मात्र खालील काही टिप्स वापरुन तुम्ही तुम्ही खमंग, लुसलुशीत पुरणपोळी बनवू शकता.
प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. मात्र पोळ्या (Puran Poli) मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबरचं जिभेवर विरघळतील अशा असाव्यात असे प्रत्येकाला वाटते.
(हेही वाचा – Crime : गॉडमदर करिमा आपाची दहशत कायम, तुरुंगातून सुटताच साक्षीदाराला धमकी)
साहित्य – १ कप चणा डाळ, १ कप किसलेला गूळ, एक कप मैदा, ७ ते ८ टेबल स्पून तेल, १ टी स्पून वेलची पूड
कृती –
1) कुकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी निथळू द्यावे. (हे पाणी वापरून कटाची आमटी तयार करता येते.)
2) डाळीतील पाणी निघून गेल्यावर ती डाळ एका भांड्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालावा. त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. ते आटवताना वरचेवर ढवळत रहावे. जर तुम्ही ते मिश्रण ढवळले नाहीत, तर ते करपू शकतो. या पुरणात चमचाभर वेलची पूड घालावी. (Puran Poli)
3) मिश्रण घट्ट झाले की गॅसवरून उतरवावे. त्यानंतर ते मिश्रण गरम असताना पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे. (मिश्रण थंड झाल्यावर ते नीट वाटले जात नाही.)
(हेही वाचा – Love Quotes in Marathi : प्रेमाच्या भावना व्यक्त करायच्या आहेत, तर मग जाणून घ्या मराठीतील हृदयस्पर्शी संवाद)
4) यानंतर मैदा घेऊन त्यात ५ ते ६ चमचे तेल आणि थोडीशी हळद घालावी. हे पीठ सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पीठ २ तास झाकून ठेवावे.
5) यानंतर पुरणाचे गोळे बनवून घ्यावे. त्या अंदाजानुसार मैद्याच्या पीठाचा गोळा घ्यावा. त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा. (Puran Poli)
7) यानंतर पोळपाटावर थोडासा मैदा टाकून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी आणि तव्यावर खरपूस भाजून घ्यावी. उत्तम चविसाठी त्यावर साजूक तूप लावावे.
8) या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस पोळ्या सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात. (Puran Poli)
(हेही वाचा – Ind vs Aus U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाचाच अडथळा)
पोळी बनवताना ही काळजी घ्या –
पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर ठेवावा. तव्यावर पोळी भाजतेवेळी ती सोनेरी लालसर रंग येईपर्यंत भाजावी. गरम पुरणपोळी लगेच डब्यात ठेवू नये. पोळी एखाद्या कागदावर गार होऊ द्यावी त्यानंतरच त्या पोळ्या डब्यात भराव्यात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community