मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्याचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना भेटून दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या सदस्यसत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केले नाही. कोणाबद्दल तक्रार करायची नाही, व्यक्तीगत भावना नाही, पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. पुढची राजकीय भूमिका दोन दिवसांत जाहीर करणार, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.
कुणाविषयी तक्रार नाही
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असे म्हटले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्पष्ट केले. कालपर्यंत आपण पक्षाच्या बैठकीत सहभागी झालो होतो. जेवढे पक्षाने मला दिले तेवढेच मीही पक्षासाठी केले आहे. पक्षाशी आपण प्रामाणिक राहिलो, मात्र आता आपल्याला पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हा व्यक्तिगत होता. आपण पक्षाच्या कोणत्याही आमदारांशी संपर्क केला नाही, असेही चव्हाण म्हणाले.
Join Our WhatsApp Community